बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेत्री आहेत ज्यांनी सौंदर्य आणि अभिनयकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. यात एक अभिनेत्री अशी आहे जिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यात जास्त चढउतार आले.
लग्नानंतर तर या अभिनेत्रीचे प्रचंड हाल झाले. जवळपास ३० वर्ष तिने नवऱ्याचा अत्याचार सहन केला. एका मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीने तिच्या पतीने तिच्यावर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. तिच्यावर झालेला अन्याय ऐकून अनेक जण थक्क झाले होते.
सध्या सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगलीये तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे रती अग्निहोत्री . रुपेरी पडद्यावर रति आणि कमल हासन या जोडीला परेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. जवळपास ४ दशकं रतिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, लग्नानंतर तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
नवऱ्याने केली जबर मारहाण
रतीने बिझनेसमन अनिल विरवानी याच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर रती, अनिलच्या वरळीमधील त्यांच्या पेंटहाऊसमध्ये शिफ्ट झाली. लग्नानंतर काही काळातच अनिलने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. अनेकदा त्याने रतीवर हात उचलला. विशेष म्हणजे मुलाच्या जन्मानंतरही रतीला होणारी मारहाण काही कमी झाली नव्हती. त्यामुळे जवळपास ३० वर्ष तिने कौटुबिंक हिंसाचार सहन केला.
पतीपासून वाचण्यासाठी घरात लपून बसायची रती
रतीने दिलेल्या मुलाखतीमध्ये बरेच खुलासे केले. यात नवऱ्याच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी त्या घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सतत लपून बसायच्या.
नवऱ्याविरुद्ध केली पोलिसात तक्रार
'टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट'नुसार, रतीचा मुलगा ज्यावेळी एका शुटिंगसाठी पुण्याला गेला होता. त्यावेळी तिला सतत जीवाला धोका असल्याची भिती वाटत होती. त्यामुळे तिने थेट पोलिसांत जाऊन तक्रार केली. मी ५४ वर्षांची एक स्त्री आहे. हळूहळू मी वयस्क होतीये आणि सततच्या मारहाणीमुळे एक दिवस माझा जीव जाईल, असं म्हणत तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर पतीवर कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करत तिने कायदेशीररित्या त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.