Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यात 3 दिवस ड्राय डे

राज्यात 3 दिवस ड्राय डे 


मद्यप्रेमींना या आठवड्याच्या अखेरीस पाण्यावरच तहान भागवावी लागेल. त्यांच्या घशाला दारुचा शेक बसणार नाही. महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस दारुची दुकानं बंद राहतील. राज्यात तीन दिवस ड्राय डे असेल. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत दारुची दुकानं बंद राहतील. तरबेज मद्यप्रेमींनी त्यासाठीची तजवीज अगोदरच केली असेल. या कारणामुळे मद्यविक्री बंद असेल.


पाचव्या टप्प्यातील मतदान

लोकसभा निवडणूक 2024 मधील राज्यातील अखेरच्या टप्प्यातील, पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. या काळात मुंबईसह परिसरातील दारुची सर्व दुकाने, आस्थापना बंद असतील. प्रशासनाने 18 ते 20 मेपर्यंत ड्राय डे ची घोषणा केली आहे. या काळात तळीरामांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष अपेक्षा आहे. तर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

केव्हा बंद असतील दुकाने

अहवालानुसार, मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून दारुची दुकाने आणि बार बंद असतील. 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारु विक्री बंद असेल. 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर दुकाने उघडतील. याशिवाय 5 जून रोजी सुद्धा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. राज्यासह संपूर्ण देशात, होळी, दिवाळी, गांधी जयंती, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी अधिकृतरित्या ड्राय डे असतो. या दिवशी मद्यविक्री करण्यात येत नाही.

बिअरची तुफान विक्री

वर्ष 2022 च्या तुलनेत गेल्यावर्षी 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात ठाणे परिसरात जवळपास 80 लाख बल्क लिटरहून अधिक बिअरची विक्री झाली. ठाणे परिसरात, मुंबई, शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगडच्या भागाचा समावेश होतो. उत्पादन शुल्काच्या आकडेवारीनुसार, वर्ष वर्ष 2022 (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान ठाणे परिसरात 904.65 लाख बल्क लिटर बिअरची विक्री करण्यात आली होती. वर्ष 2023 (एप्रिल ते ऑक्टोबर) दरम्यान 988.32 लाख बल्क लिटर बिअरची विक्री झाली.

138 कोटींची केली कमाई

मुंबईसह ठाणे भागात मद्यविक्री वाढल्याने सरकारच्या कमाईतही मोठी वृद्धी झाली. 138.38 कोटींचा महसूल वाढला. गेल्या सहा महिन्यात दारु आणि बिअरच्या विक्रीतून सरकारला 1719.16 कोटींचा महसूल मिळाला. वर्ष 2023 मध्ये सहा महिन्यात सरकारची कमाई वाढून 1857.54 कोटी रुपयांपर्यंत पोहचली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.