Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चोरीच्या ट्रकची बनावट नोंदणी :, 3 RTO अधीकाऱ्यांना अटक

चोरीच्या ट्रकची बनावट नोंदणी :, 3 RTO अधीकाऱ्यांना अटक 


अमरावती: चोरीच्या ट्रकची बनावट नोंदणी केल्याप्रकरणी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि.४) अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासानंतर कारवाई करत एकूण नऊ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यामध्ये अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील, मोटार निरीक्षक गणेश वरुटे आणि सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके या तीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.


देशभरातील विविध राज्यातून चोरलेल्या ट्रकसह अवजड वाहनांचे चेचीस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून त्याची नोंदणी केली जात होती आणि ते परराज्यात विकले जात होते. नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदपत्रांच्या आधारावर वाहनांची नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जात होती. अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेचिस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे अमरावती आणि नागपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार सुरू होता. दरम्यान या कारवाईनंतर कायम दलालांच्या गर्दीने गजबजलेल्या आरटीओ कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि.३) सन्नाटा पसरला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.