महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात आला आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली होती.
हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे. ५ पैकी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांवर गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. सचिन अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. त्यांना 5 लाख दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आज या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. याबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बोलताना सांगितले की, न्यायालयाचे निकालाचे आम्ही स्वागत करतो. या प्रकरणात २ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. जे निर्दोष सुटले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.