Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्षुल्लक कारणावरून 2 सख्या भावांचा खून

क्षुल्लक कारणावरून 2 सख्या भावांचा खून 


बेळगाव : क्षुल्लक कारणावरून चाकूने तरुणावर वार केल्याने तरुण जागीच ठार झाला, त्याचा मोठा भाऊ सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही चाकूने वार केल्याने उपचार सुरू असताना आज त्याचाही मृत्यू झाला. दोघा सख्ख्या भावांचा खून झाल्याची ही घटना सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडजवळील दुंडीनकोप्प येथे मंगळवारी (दि.७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. मायाप्पा (वय 20) व यल्लाप्पा (वय 23) अशी मृत भावंडांची नावे आहेत. त्यांचा खून करणाऱ्या संशयित फकीरापाला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मायाप्पा व फकीराप्पा हे दुंडीनकोप्प येथील एकाच भागात राहणारे असून गेल्या काही दिवसांपासून मायाप्पा हा फकीरापाच्या अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे लागला होता. तिच्याशी आपले लग्न करून दे, असे म्हणत त्याने फकीरापाच्या घरासमोर जाऊन भांडणही काढले होते. सतत सांगूनही मायाप्पा ऐकत नाही, म्हटल्यानंतर फकीराप्पाने मंगळवारी रात्री रागाच्या भरात त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये तो जागीच गतप्राण झाला.

यल्लाप्पा याच्यावरही फकीराप्पाने चाकूने वार केले

भावाला सोडवण्यासाठी मायाप्पाचा मोठा भाऊ यल्लाप्पा पुढे गेला असता फकीराप्पाने त्याच्यावरही चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत यल्लाप्पाला रुग्णालयात नेले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता बुधवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला. मुरगोड पोलिसात नोंद झाली असून फकीराप्पाला अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.