Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना! ट्रकनें 29 मुलांना चिरडले,18 गंभीर

कल्चरल  फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना!ट्रकनें 29 मुलांना चिरडले,18 गंभीर 


फेस्टिवलचा विद्यार्थी आनंद घेत होते. सर्व विद्यार्थी उत्साहात होते. त्यानंतर अचानक कल्चरल फेस्टिवलदरम्यान विद्यार्थ्यांच्या गोंधळ उडाला. या फेस्टिवलमध्ये आईस्क्रीम ट्रकने काही विद्यार्थ्यंना चिरडलं. या घटनेत २९ मुलांना चिरडत व्हॅन पुढे गेली.

आईस्क्रीम ट्रक विद्यार्थ्यांना चिरडत पुढे जाऊन एका भिंतीला धडकला. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. या विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आहेत. या दुर्घटनेत एकूण १८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मीडिया रिपोर्टानुसार, पूर्व सोव्हिएत रिपब्लिक किर्गिस्तानच्या डोंगराळ भागात ही घटना घडली. या घटनेला आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्यांनी दुजोरा दिला आहे. या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी या व्हायरल व्हिडिओची माहिती घेतली. या घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

पोलिसांनी निर्देश देताना म्हटलं की, या घटनेत चालक जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या घटनेनंतर पोलिसांनी चालकाची चौकशी केली, त्यावेळी त्याने हँडब्रेक मारण्याचं विसरल्याने ही घटना घडली. त्यामुळे या घटनेत विद्यार्थी चिरडले गेले. माझ्याकडून अनावधानाने ही घटना घडली.

विद्यार्थी झाले बेशुद्ध

मीडिया रिपोर्टनुसार, चालकाकडून भरधाव वेगात विद्यार्थ्यांना चिरडलं. या घटनेतील विद्यार्थ्याचं वयोगट हे ९ ते १६ वयादरम्यान आहे. तर या दुर्घटनेनंतर या विद्यार्थ्यांवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघघातानंतर काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. किर्गिस्तानमध्ये मार्च महिन्यातही एक मोठी दुर्घटना घडली. २ विशाल हत्ती उत्सवात पिसाळल्यानंतर लोकांना जीव मुठीत धरून पळावलं होतं. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.