लोकसभा निवडणुकीनंतर कोट्यावधी मोबाइल युजर्सला धक्का बसण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाइल टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. या किंमती 25 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहेय. यामुळे कंपन्यांचा महसूल वाढणार आहे.
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस कॅपिटलच्या एका रिपोर्ट्सनुसार, कंपन्यांनी 5G सुविधेत मोठी गुंतवणूक केली आहे. अशातच कंपन्यांना त्यांना होणारा नफा याकडे अधिक लक्ष देत आहे. रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत केवळ शहरातच नव्हे ग्रामीण भागातही वाढल्या जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन देखील आधीच्या किंमतीपेक्षा अधिक महाग होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला इंटनेट प्लॅनच्या किंमतीही वाढू शकतात.
नफ्यात वाढ होण्यासाठी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाइल रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्यामागील कारण प्रति युजरच्या मागे महसूलात वाढ करण्याचे आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांचा प्रति युजर महसूल फार कमी आहे. याचा अर्थ असा होतो की, मोबाइल कंपन्या प्रत्येक युजरसाठी पैसे खर्च करत असतली तरीही समाधानकारक कमाई होत नाहीये. याच कारणास्तव टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.
किती रुपयांनी महागणार रिचार्ज प्लॅन?
रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाल्यास सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला 200 रुपयांचा रिचार्ज करत असल्यास त्यात 50 रुपयांची अधिक वाढ होईल. याचा अर्थ असा होतो की, 200 रुपयांच्या रिचार्जसाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय 1 हजार रुपयांच्या रिचार्जमध्ये 250 रुपयांपर्यंत वाढ होईल.
मूळ किंमतीत वाढ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यास टेलिकॉम कंपन्यांच्या मूळ रिचार्जच्या किंमती वाढल्या जाणार आहेत. एअरटेल कंपनीच्या मूळ किंमतीत 29 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जिओमध्ये 26 रुपयांची वाढ होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी वर्ष 2019 आणि 2023 दरम्यान रिचार्ज प्लॅमध्ये तिप्पट वाढ केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.