ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला :, आमदार पुत्रासह 25 ते 30 जणावर गुन्हा दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय चालक देखील जखमी झाला आहे.
या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरुवारी (ता. २) महाड येथे जाहीर सभा होती. या सभेला अनिल नवगणे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते. सभा संपल्यानंतर ते इंदापूर येथील आपल्या घरी कारने परतत होते.
त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी अचानक लाठ्या-काठ्या घेऊन कारवर हल्ला चढवला. यावेळी कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली.त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले. या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय चालकाला देखील दुखापत झाली आहे. दरम्यान, हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला असा आरोप नवघरे यांनी केला आहे.हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले घटनास्थळी हजर होते, असंही नवघरे यांनी म्हटलं आहे. महाड येथील सभेत मी आमदार भरत गोगावले यांच्यावर टीका केल्याने त्यांनी सुडबुद्धीने माझ्यावर हल्ला केला, असं म्हणत नवघरे यांनी भरत गोगावले यांच्यासह त्यांचे पुत्र विकास गोगावलेंवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशिरा नवगणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.