Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुन्हा ईडीची नोटीस येईल,2024 मध्ये अजित पवारांनी दैवत बदललेले असेल :, संजय राऊत यांचे संकेत

पुन्हा ईडीची नोटीस येईल,2024 मध्ये अजित पवारांनी दैवत बदललेले असेल :, संजय राऊत यांचे संकेत 


महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत राज्यावर अनेकांची, व्यापारांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे. ती आज सुद्धा आहे. दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे.

काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केले जात असल्याची टीका ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 


शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभी आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली. शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहतील आणि लढत राहतील, असे राऊत म्हणाले. 2024 ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत अजित पवारांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदलेला असेल, असा टोला राऊत यांनी लगावला. 

आजच्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे. मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक जे फोर्ट ला आहे हे सुद्धा पाहुन यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची औरंगजेबाची कबर आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक दोन्ही प्रतीके आहेत. सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती यापूर्वी अशी नव्हती. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकला नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला थैलीचे राजकारण म्हणतात, असा आरोप राऊत यांनी केला. 

तसेच शिवसेना फडणवीस गट बारा-तेरा जाग लढवत आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना सातत्याने 21 , 22 जागा लढत आलेली आहे. 22 वी जागा होती, ती उत्तर मुंबईची जागा आम्ही काँग्रेसला दिली. शिवसेना फडणवीस गट १२-१३ जागा लढवत आहे. याला लोटांगन घालणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाही आणि अनेक ठिकाणी जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले ही काही स्वाभिमानाची गोष्ट नाही ही एक लाचारी आहे, अशी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.