मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दीपक बद्री नागरे (वय 35, रा.मुकुंदवाडी) याला दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केली.
मारहाण करतच त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. नागरेच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे मुकुंदवाडीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करण्यात आलेला तरुण दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचा आरोप होत आहे.
तर त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक नागरेचे घर गाठत त्याला मारहाण केली आहे. तर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या दीपक विरोधात मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आले आहे. जरांगेंच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला माफी मागायला लावली. ‘माझ्या कडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. ती नजरचुकीने झाली होती. या बद्दल मी मराठा समाजाची माफी मागतो, या शब्दांत तरुणाने माफी मागितली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.