महिन्याला 1 कोटींचा हप्ता घेणाऱ्या 'एक्साइज' डिपार्टमेंटच्या अधीक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात अँटी करप्शनकडे तक्रार
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब्ज आणि बारच्या मालकांकडून पुणे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा करतात असा आरोप करण्यात आल्यानंतर त्याची यादी जाहीर करत भांडाफोड करण्यात आला. पुण्यातील 'नाइटलाइफ'ला पाठीशी घालणारे उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना राजकीय नेत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात अॅन्टी करप्शनकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे चरणसिंह रजपूत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणानंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. शहरात अवैधरीत्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्यावर विरोधकांनी राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी विभागाला पुण्यातील हप्तेखोरीचे रेटकार्ड देण्यात आले. यानंतर आता शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी अँन्टी करप्शन ब्युरोला पत्र देऊन राज्य उत्पादन शुलक् विभागाचे अधीक्षक, कर्मचारी यांच्या मालमत्तेची व व्यवहाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे अधीक्षक चरणसिंग रजपूत, सागर सुर्वे, कॉन्स्टेबल (रजपूत यांचा चालक/खासगी कामे पाहणारा कर्मचारी) समीर पडवळ, पिंपरी विभागात नेमणुकीस असणारा आणि राजपूत यांच्या सतत संपर्कात असणारे कॉन्स्टेबल स्वप्निल दरेकर यांच्या मालमत्तेची व व्यवहाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी अजय भोसले यांनी एसीबीकडे केली आहे.अधिकारी व कर्मचारी हे सरकारी नोकर असून त्यांनी पुणे शहर व ग्रामीण भागातील पब, बार, वाईन शॉप, बिअर शॉपी, हॉटेल चालक/मालक, यांच्याकडून प्रतिमहिना 60 ते 70 लाख रुपये लाच गोळा करुन ती राजपूत यांच्याकडे जमा केल्याचे भोसले यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच कोणाकडून किती रुपये पैसे घेतले जातात याचा तपशील त्यांनी एसीबी चे पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.लेट नाईट व रुटटॉफ हॉटेल, द माफिया- एक लाख, 2. एजंट जॅक्स : आऊटलेटप्रमाणे प्रत्येकी ५० हजार (१२ ले आऊट), 3. बॉलेर बार -2 लाख महिना, 4. 2 बीएचके (राजा बहादूर मिल) -1 लाख, 5. दिमोरा - एक लाख, 6. मिलर - एक लाख, 7. टीटीएफ रुफटॉप, बाणेर -50 हजार, 8. बॅक स्टेज विमाननगर अँड मोहम्मदवाडी -90 हजार, 9. ठिकाना आऊटलेट -1.5 लाख, 10. स्काय स्टोरी -50 हजार, 11 जिमी दा ढाबा पाषाण - 50 हजार, 12. टोनी ढाबा पाषाण - 50 हजार, 13. आयरिश - 40 हजार, 14. टल्ली टुन्स - 50 हजार, 15. अॅटगोरट फेअर - 60 हजार, 16. रुडलॉज -60 हजार, 17. द टिप्सी हॉर्स -60 हजार, 18. रेन फॉरेस्ट रेस्टो बार - 50 हजार, 19. टू बीएचके बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड -दीड लाख, 20. कॅपे सीओ 2, हुक्का बार, हॉटेल भुकूम - एक लाख, 21. स्मोकी बिच हॉटेल -75 हजार, 23. हॉटेल सरोवर - एक लाख, 24. जिप्सी हॉटेल 50 हजार, 25. सायबा हॉटेल 30 हजार याशिवाय वाईन शॉपचा माल ठेवणारे सनी होहा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन्स शॉप, 3 बिअर शॉपी व इतर ढाबे - साडे तीन लाख, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे (६६ बार, ३० वाईन शॉप, ३५ बिअर शॉप)- साडे पाच लाख, कैलास जगताप व अन्य (११ बार, ८ वाईन शॉप, ९ बिअर शॉप) - अडीच लाखकोरेगाव पार्क व कल्याणी नगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर भागातील सर्व लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंट प्रत्येकी कमीत कमी 50 हजार महिन्याला हप्ता, वाईन शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला 20 हजार हप्ता, रेस्टॉरंट व ढाब्याच्या ठिकाणी अवैध दारु विक्रीसाठी महिन्याला 25-50 हजार रुपये प्रत्येकी हप्ता वसुल केला जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.बेकायदेशीर व्यवहार करुन या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करोडो रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावे बेकायदेशीरपणे खरेदी केलेली आहे. त्यांचे आर्थिक व्यवहार तपासून त्यांच्यावर तात्काळ अपसंपत्तीचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी अजय भोसले यांनी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात अजय भोसले यांनी तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक यांची परवानगी घेण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. ससूनमधील डॉ. अजय तावरे यांच्या विरोधातील कारवाईबाबत पुणे पोलिसांकडून अद्याप पत्र प्राप्त झालेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.