Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1 अंडरवेअर किती दिवस वापरावी?जास्त दिवस वापरल्यास होऊ शकतो 'हा ' आजार

1 अंडरवेअर किती दिवस वापरावी?जास्त दिवस वापरल्यास होऊ शकतो 'हा ' आजार 



आपण वापरतो त्या प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. तसेच कपड्यांचीही एक्सपायरी डेट असते. आपण वापरतो त्या अंडरवेअरचीही एक्सपायरी डेट असते. त्यामुळे काही दिवसांनंतर आपल्याला आपली अंतर्वस्त्रे बदलण्याची गरज असते. मात्र वेळेत अंतर्वस्त्रे न बदलल्यास आपल्याला गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे अंडरवेअर किती दिवसांनी बदलावी आणि ती जास्त दिवस वापरल्याने काय आजार होऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात... 


संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 

भारतातील अनेकजण एक अंडरवेअर सलग दोन दिवस घालतात. दर 5 पैकी 1 जण असा आहे जो अंडरवेअर दोनदा घातल्यानंतर एकदा धुतो. यात पुरुष हे महिलांपेक्षा पुढे असल्याची माहितीही एका संशोधनातून समोर आली आहे. जवळपास 31 टक्के पुरुष गलिच्छ अंडरवेअर घालतात तर 10 टक्के महिला एकदा वापरलेली अंडरवेअर न धुता पुन्हा वापरतात. 

बाजारात सध्या अनेक प्रकारचे अंडरवेअर उपलब्ध आहेत. त्यांच्या साईज आणि आकापावरुन त्यांची किंमत ठरली जाते. मात्र अंडरवेअरचा ब्रँड कितीही महाग असला तरी काही काळानंतर ते बदलणे आवश्यक असते. Longone Health चे MD, तेरनेह शिरजियान यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

जुन्या अंडरवेअरमुळे इन्फेक्शनचा धोका 

तेरनेह शिरजियान यांनी म्हटले की, अंडरवेअरची एक्सपायरी डेट असण्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा सापडलेला नाही. जुनी अंडरवेअर घातल्याने मोठे नुकसान होते याबाबत माहिती उपलब्ध नाही, मात्र जुन्या अंडरवेअरमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे ॲलर्जी आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

जुन्या अंडरवेअरमुळे होऊ शकतात हे आजार 

जुनी अंडरवेअर आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. अंडरवेअर काही काळानंतर सैल बनतात, त्यामुळे त्यात ओलावा राहतो, या ओलाव्यात यीस्ट किंवा इतर संसर्गजन्य जीवाणू वाढतात. अशा अंडरवेअर घातल्याने शरीरावर पुरळ उठने तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होणे असे आजार होतात. 

अंडरवेअर किती दिवसांनी बदलावी ? 

NYU स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर फिलिप टियरनो यांच्या मते, कोणत्याही अंडरवेअरची एक्सपायरी डेट नसते. मात्र तुमची अंडरवेअर सैल झाली असेल किंवा त्यात छिद्र असतील तसेच त्याचे रबर सैल झाले असेल, तर हे तुम्ही तुमची अंडरवेअर बदलावी. कारण ढिली झालेवी सैल अंडरवेअर तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. त्यामुळे तुम्ही वेळीच ते बदलावे. असंही म्हटले जाते की, जर तुम्ही दररोज तीच अंडरवेअर वापरत असाल तर दर 6 महिन्यांनी अंडरवेअर बदलावी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.