Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

11 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने ठेवले संबंध, लग्नाच्या काही दिवसआधी झाला खुलासा...

11 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने ठेवले संबंध, लग्नाच्या काही दिवसआधी झाला खुलासा...

एका महिलेला पाचव्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. या महिलेचं काही महिन्यांमध्येच लग्न होणार होतं. जेव्हा याबाबत तिच्या होणाऱ्या पतीला समजलं तेव्हा त्याने लग्न मोडलं. ही महिला एलीमेंट्री स्कूलमध्ये टीचर आहे. मेडिसन बर्गमन नावाच्या महिलेचं लग्न सॅम हिकमॅनसोबत जुलै महिन्यात होणार होतं. पण जेव्हा तिचं 11 वर्षाच्या मुलासोबत अफेअर असल्याचं समजलं तेव्हा तिच्या होणाऱ्या पतीला धक्का बसला.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील आहे. सॅमच्या मित्राने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेचा खुलासा केला. सॅमचा मित्र म्हणाला की, 27 जुलैला होणारं लग्न मोडण्याचा निर्णय सॅम आणि मेडिसन दोघांचाही होता. मेडिसनने एका लहान मुलासोबत संबंध ठेवून सॅमला दगा दिला आहे. तो आता टेंशनमध्ये आहे. तिने केवळ दगा दिला नाही तर एका लहान मुलासोबतही चुकीचं केलं आहे.

लहान मुलाच्या आई-वडिलांनी जेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये मेसेज चेक केले तेव्हा 24 वर्षाच्या मेडिसनचा भांडाफोड झाला. मुलाच्या वडिलाने शाळेत जाऊन तक्रार केली होती. ज्यानंतर चौकशी करण्यात आली. या मेसेजमधून समजलं की, मेडिसन त्या मुलाला लंच दरम्यान आणि सुट्टी झाल्यावर भेटत होती. मेसेजमध्ये मेडिसन मुलाला म्हणत होती की, त्याला स्पर्श करून तिला किती चांगलं वाटतं. पोलिसांना मेडिसनच्या बॅगमध्ये मुलांच्या नावाचं एक फोल्डरही सापडलं. ज्यात हाताने लिहिलेल्या नोट्स होत्या. यात मेडिसनने लिहिलं होतं की, दोघांनी किती वेळा किस एकमेकांना किस केलं.

अजून हे स्पष्ट नाही की, मेडिसनने या मुलासोबत कधीपासून हे सगळ करत होती. तिचं म्हणणं आहे की, मुलाचा नंबर त्याच्या आईने तिला डिसेंबरमध्ये दिला होता. याच महिन्यात मेडिसनचा साखरपुडा झाला होता. तिच्यावर आता मुलाचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. नंतर तिला 25 हजार डॉलरच्या बाँन्डवर सोडण्यात आलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.