Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जुळ्या बहिणीच्या सवई सारख्याच, आणी 10 वीत मिळालेले गुणही सारखेच

जुळ्या बहिणीच्या सवई सारख्याच, आणी 10 वीत मिळालेले गुणही सारखेच 


पंढरपूर : जुळ्याचे दुखणे ही म्हण मराठी भाषेत प्रचलित असून ती नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. मात्र, पंढरपूर तालुक्यातील  करकंब येथील याच जुळ्या बहीणीनीदहावीच्या परीक्षेत एकहाती यश मिळवत साऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.
विशेष म्हणजे, या दोन्ही मुलींचे स्वभाव, सवयी सगळे सारखे आहे. शिवाय दहावीचा अभ्यास देखील या दोघींनी मिळून केला आणि काल लागलेल्या निकाल पाहताना त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. तो म्हणजे या दोघी जुळ्या बहीणीने परीक्षेत मिळवलेले गुण देखील सारखेच आहेत. हा योगायोग म्हणावं की अजून काही, मात्र त्यांच्या या कामगिरी मुळे त्यांच्याप्रती एक कुतूहल नक्कीच निर्माण झाले आहे. 
सवयी, स्वभाव अन् दहावीत मिळालेले गुणही सारखेच
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील तेजश्री आणि तृप्ती सुरेश नागणे या जुळ्या बहिणी दहावीचे शिक्षण घेत होत्या. त्यासाठी त्यांनी सोबतच अभ्यास केला आणि परीक्षाही दिली. तर या परीक्षेचा निकाल सोमवारी लागला. यात तेजश्री आणि तृप्तीने समान 93 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. निकाल लागल्यावर वडील सुरेश नगणे याना एकच वेळी आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचा निकाल पहायची उत्सुकता होती. त्यांच्या दोन्ही मुलींचे स्वभाव, सवयी सगळे सारखे आहे. अभ्यास देखील दोघींनी मिळून केला.

मात्र परीक्षा म्हटली की दोघांमध्ये काही अंशी स्पर्धा असल्याचे देखील चित्र होतं. त्यामुळे सर्वार्थानं एकसारख्या असणाऱ्या या दोन जुळ्या बहिणी परीक्षेत नेमकं काय करतात याकडे सऱ्यांचे लक्ष होत. मात्र निकाल हाती येताच त्यांनी आपल्या नित्यक्रम परीक्षेतही कायम ठेवला आहे. त्यांचा हा निकाल पाहताना नागणे कुटुंबियासह सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील या आदर्श प्रशालेच्या निकाल 98.78 टक्के लागला आहे . प्रशालेत प्रथम क्रमांक कुमारी तेजश्री सुरेश नागणे 93 टक्के आणि कुमारी तृप्ती सुरेश नागणे 93टक्के मिळवले आहेत. तर द्वितीय क्रमांक सुमित पांडुरंग मराळ 92.80 टक्के, तृतीय क्रमांक गायत्री रमेश जव्हेरी 92 टक्के, चतुर्थ क्रमांक विभागून स्वप्निल संतोष गुळमे 91.40 टक्के तर मांजरे राजनंदिनी विश्वनाथ 91.40 टक्के गुण मिळविले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बाळासाहेब देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे, संस्थेचे सचिव पांडुरंग व्यवहारे, प्राचार्या विजय उंडे तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक, कर्मचारी वर्गाने अभिनंदन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.