खाण कोसळून 10 मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक मजूर दबल्याची भीती
नवी दिल्ली : दगडांच्या खाणीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. दगडांची खाण कोसळून 10 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनेक मजूर मलब्याखाली दबल्याची माहिती मिळाली आहे. खाण कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर तातडीने पोलीस आणि रेस्क्यूसाठी आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली.
खाणीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर मलब्याखाली काही मजूर अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सर्च ऑपरेशन आणि रेस्क्यू ऑपरेशन दोन्ही सुरू आहे. या खाणीतून 10 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिझोरामच्या दगडी खाणीत ही दुर्घटना घडली आहे.
मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये हा अपघात झाला. रामल चक्रीवादळामुळे येथे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला होता. दरम्यान, मंगळवारी (28 मे) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम आणि हॅलिमेन सीमेवर दगडाची खाण कोसळली. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.
दोन वर्षांपूर्वी मिझोराममध्येही अशीच दुर्घटना घडली होती. राज्यातील हनथियाल जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 2022 रोजी दगडाची खाण कोसळली होती. खाण सुरू असताना अनेक मोठे दगड वरून फुटून कामगारांवर पडले, त्यामुळे 12 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
आसाम रायफल्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ), स्थानिक पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकाने बचाव कार्य केले, त्यानंतर खाणीत गाडलेल्या 11 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.