Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुष्काळी भागातील 10,12 वीच्या 23 हजार विध्यार्थीना 1 कोटीं रुपये परीक्षाशुल्क परत मिळणार

दुष्काळी भागातील 10,12 वीच्या 23 हजार विध्यार्थीना 1 कोटीं रुपये परीक्षाशुल्क परत मिळणार 


सांगली : टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात २३ हजार विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार आहे. शासनाने गतवर्षी राज्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. 

सध्या त्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. इतर काही तालुक्यांतील १०२१ महसूल मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३९ महसुली मंडलांचा समावेश आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या माध्यमिक शालांत (दहावी) व उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेस बसलेल्या या मंडलांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीचा लाभ मिळेल.


दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८० रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क परत मिळणार आहे. हे पैसे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची माहिती शासनाने परीक्षा मंडळांकडे मागितली आहे. मंडळाने जिल्हा परिषदांकडे व जिल्हा परिषदेने जिल्हाभरातील माध्यमिक शाळांकडून माहिती मागवली आहे. सध्या ही प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण होताच विद्यार्थ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होणार आहेत.

जिल्ह्यातील ३९ महसूल मंडलांतील विद्यार्थी

जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ३९ महसूल मंडलांत दुष्काळाच्या सवलती लागू आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच, वाळव्यातील ११, जतमधील नऊ, तासगावमधील सात, पलूसमधील चार आणि आटपाडीमधील तीन मंडलांचा समावेश आहे. तेथील विद्यार्थी संख्या २३ हजार २१७ असून त्यांना एक कोटी १३ लाख ३८ हजार ९०० रुपये परत मिळतील. 

दहावीचे लाभार्थी विद्यार्थी

लाभार्थी शाळा लाभार्थी विद्यार्थी प्रतिपूर्तीची रक्कम
२५२ १३२२८ ६३,४९,४००

बारावीचे लाभार्थी विद्यार्थी

लाभार्थी शाळा लाभार्थी विद्यार्थी प्रतिपूर्तीची रक्कम
९२ ९९८९ ४९,८९,५००

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.