मृत्यूनंतर PAN, Passport, आधार कार्ड आणि Voter Id चं काय करायचं ? जाणून घ्या. नाहीतर बसेल मोठा फटका.
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांना तसेच कुटुंबियांना गमावलं. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं. नियमांनुसार मृत व्यक्तीच्या पॅन कार्ड PAN Card, आधार कार्ड Aadhar Card, व्होटिंग आयडी Voter Id Card, पासपोर्ट Passport या आणि यासारख्या इतर ओळखपत्रांचं काय करायचं असतं, हे आपण या बातमीतून जाणून घेऊया.
पॅन कार्ड
इनकम टॅक्स रिटर्न भरत असाल तर पॅन नंबर असणं महत्त्वाचं असत. पॅन नंबर म्हणजे तुमचा पॅन कार्ड नंबर. पॅन नंबर हा डि मॅट, बँक अकाउंटला लिंक असतो. त्यामुळे मृत व्यक्तीचं पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट करणं महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीचं पॅन कार्ड चुकून इतर व्यक्तीच्या हाती लागलं तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आव्हानात्मक प्रसंग उद्भवण्याआधी पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट करणं गरजेचं ठरतं.
जर तुम्हाला मृत व्यक्तीचं पॅन कार्ड उपयोगी पडणार असेल, तर ते तुम्ही वापरू शकता. पण त्याचा काही वापर होणार नसेल तर ते रद्द करायला हवं. त्यासाठी मृताच्या कुटुंबियांनी आयकर विभागाशी संपर्क करावा. पॅन कार्ड रद्द करण्याआधी कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या नांवावर असलेले सर्व बँक खाती, रद्द किंवा दुसऱ्याच्या नांवे ट्रांस्फर करायला हवी.
आधार कार्ड
मृत्यूनंतर आधार कार्ड (UIDAI) रद्द करण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचं आधार कार्ड सांभाळून ठेवणं ही कुटुंबियांची जबाबदारी आहे, जेणेकरुन त्याचा गरैवापर होणार नाही. संबंधित मृत व्यक्ती, मृत्यूआधी जर आधार कार्डाद्वारे कोणत्याही योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ घेत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यायला हवी. त्यानंतर मृत व्यक्तीचं नांव त्या योजनेतून रद्दबातल केलं जाईल.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड लॉक केलं जाऊ शकतं. M-Aadhar या अॅप किंवा UIDAI च्या वेबसाईटद्वारे मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक करता येऊ शकतं. यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर होणार नाही.
व्होटर आय् डी कार्ड
मृत्यूनंतर मृत व्यक्तीचं व्होटिंग कार्ड रद्द करणं महत्वाचं असतं. अन्यथा मृत व्यक्तीच्या नांवे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नांव रद्द करण्यासाठी स्थानिक मतदान कार्यालयात फॉर्म 7 भरावा लागतो. त्यानंतर व्होटिंग कार्ड रद्द होतं
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.