Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LPG गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!!

LPG गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!!

लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून उज्वला योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडी योजनेत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे आता पुढील आर्थिक वर्षातही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे. म्हणजेच, उज्वला योजनेचे लाभार्थी 31 मार्च 2025 पर्यंत सबसिडीचा लाभ घेऊ शकतील.

उज्वला योजनाही मोदी सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेला 2016 साली सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी 2024 पर्यंतच लागू होती. परंतु आता सरकारने या सबसिडीत आणखीन एका वर्षाची मुदतवाढ केली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरे तर, गेल्या ऑक्टोंबर 2023 मध्येच सरकारने सबसिडीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 14.2 kg घरगुती LPG गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येत आहे. मात्र एका आर्थिक वर्षात फक्त 12 गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. यापेक्षा अधिक गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत नाही. त्याचबरोबर या सबसिडीचा लाभ फक्त उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घेता येऊ शकतो. असे असले तरी, देशातील अनेक लोक या योजनेशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यांना या सबसिडीचा सर्वाधिक फायदा होत आहे.

आता मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबसिडीत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2025 पर्यंत लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. परंतु त्यानंतर योजनाअंतर्गत दिली जाणारी सबसिडी बंद केली जाऊ शकतो. यामुळे लाखो लाभार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. याचा विचार करून सरकार भविष्यात उज्वला योजनेबाबत आणखीन वेगळा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.