Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; अजित पवार, सुनेत्रा पवारांना EOW कडून क्लीन चीट

शिखर बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. EOW कडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नसल्याचं EOW ने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अजित पवार यांच्याबरोबरच EOW ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लोजर रिपोर्टमध्ये क्लीन चिट दिली आहे.

बँकेला कोणतही आर्थिक नुकसान झालं नसल्याचंही EWO ने म्हटलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १३४३.४१ कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावाही EWO ने क्लोजर रिपोर्टमधून केला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात जानेवारी महिन्यात दाखल करण्यात आलेल्या EWO च्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता समोर आला आहे.

शिखर बँकेने जवळपास १५ ते २० वर्षांपूर्वी राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं. ते कारखाने तोट्यात गेल्यानं कर्ज बुडीत खात्यात गेली. मात्र तेच कारखाने नंतर काही नेत्यांनी खरेदी केले आणि पुन्हा त्याच कारखान्यांना शिखर बँकेनंच कर्ज दिल्याचा आरोप झाला.

यामध्ये शिखर बँकेला तब्बल २ हजार ६१ कोटींचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला. प्रक्रियेचं पालन न करता साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपये दिल्याचा आरोप झाला . विशेष म्हणजे सिंचन आणि शिखर बँकेवरुन सत्ताधारी भाजपनेच अजित पवारांवर अनेकदा आरोप केले होते.

शिखर बँक घोटाळा प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रिपोर्ट सादर झाला होता. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर याप्रकरणी पुन्हा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता EWO ने क्लोजर रिपोर्ट सादर करत अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना क्लीन चीन दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.