Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुरुचरण सिंगच अपहरण? पोलीसांना सापडलं CCTV फुटेज

गुरुचरण सिंगच अपहरण? पोलीसांना सापडलं CCTV फुटेज 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम ३६५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेज लागले आहे, त्यावरून हे अपहरणाचे प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.

गुरुचरण काही कामानिमित्त मुंबईला जाणार होता, त्याबद्दल त्याने मुंबईतील मित्रांनाही कळवलं होतं. त्याची भक्ती सोनी नावाची मैत्रीण त्याला घ्यायला विमानतळावर पोहोचली होती, पण गुरुचरण पोहोचलाच नाही. दरम्यान, पोलिसांनी मुलाला शोधण्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती गुरचरण सिंगचे वडील हरगीत सिंग यांनी दिली आहे. मला आशा आहे की तो जिथे असेल तिथे बरा असेल आणि पोलीस त्याला लवकरच शोधून काढतील, असं ते म्हणाले.

५० वर्षीय गुरुचरण सिंग पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. सुरुवातीच्या तपासानुसार गुरुचरण २२ एप्रिलला सकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला. त्याचे साडेआठ वाजता फ्लाइट होतं, पण तो विमानात बसलाच नाही.

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, २५ एप्रिलला दुपारी त्याच्या वडिलांनी पालम पोलिसांत तक्रार दिली होती, तपासात आता पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे, ज्यात गुरुचरण जाताना दिसतोय. २४ एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता, पण आता तो बंद येत आहे. पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या आहेत. त्याने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचंही दिसून आलंय, हे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत आहेत.

गुरुचरणची आई खूप आजारी असतात, त्या रुग्णालयात दाखल होत्या, पण आता ठीक आहे. पण अचानक तो बेपत्ता झाल्याने घरचे चिंतेत आहेत. पोलिसांवर पूर्ण विश्वास असून ते त्याला शोधून काढतील, असा विश्वास कुटुंबाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुरुचरणचा शोध घेतला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.