Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेप 


सांगली :  जत तालुक्यातील खिलारवाडी येथे अनैतिक संबंध तोडल्याच्या रागातून महिलेचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सश्रम कैद, तसेच कलम ३४२ नुसार सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शमार् यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जे. के. लक्का यांनी काम पाहीले.  


पांडुरंग कामू लोखंडे (वय ३३, रा. खिलारवाडी, ता. जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुनिता लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. पांडुरंग आणि सुनिता यांच्यात सात ते आठ वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्याबद्दल त्यांच्या घरच्यांना समजल्यानंतर सुनिता हिने त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्यामुळे पांडुरंगला राग आला होता. त्यानंतर दि. ३० डिसेंबर २०१८ रोजी पांडुरंगने सुनिताला त्याच्या घरात जबरदस्तीने नेले. तेथे चाकूने तिच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर, पोटावर वार करून तिचा खून केला होता. 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केला होता. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादी, पंच, डॉक्टर यांचा जबाब नोंदवून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या. शमार् यांनी पांडुरंग याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.