गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे, आहे, निवडणूक कारवाईचे आदेश दिले आहेत. आयोगाने या प्रकरणी नितीन गडकरी यांच्या प्रचारात शाळकरी मुलांचा वापर करून करून आदर्श आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकूडे ३ एप्रिल २०२४ केली होती. तसेच गडकरींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीनुसार, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील गडकरी यानी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला. १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लघन आहे, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली होती.या प्रकरणर्णी एनव्हीएम फुलवारी शाळा, वैशालीनगर, नागपूर या शाळेचे संचालक व मुख्याधापिका यांना सुनावणी सुनावणीसाठी बोलावण्यात आले. सुनावनीअंती व त्यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार या प्रकरणी शाळा संचालक मुरलीधर पवनीकर हे दोषी आढळून आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांच्या स्वागताकरिता शालेय विद्यार्थ्यांचा अनावश्यपणे वापर केल्याचे दिसून आले. त्यामुळे शाळेचे संचालकावर नियमानुसार कार्यवारही करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यामिक) यांना देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.