अजमेर : लग्न म्हणजे दोन शरीर एक जीव असं नात. आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्य समृद्ध होतं पण तोच चुकीचा असेल तर चांगलं आयुष्य नरक बनतं. अशीच एक महिला लग्नानंतर नरकयातनाच भोगत होती. लग्नानंतर तिचा नवरा असं काही करत होता की तिची रात्रीची झोप उडाली होती. लग्नाला एक महिना झाला आणि तिचा मृत्यू झाला.
अलवरच्या तिजारा परिसरात राहणारी सोनम. नर्सिंगचे शिक्षण घेत असताना मनोजशी तिची ओळख झाली. मनोज बिहारमध्ये कंपाउंडर म्हणून काम करत होता. महिनाभरापूर्वी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतरचे सहा दिवस अगदी चांगले गेले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण सहा दिवसांनी मनोज असं काही करू लागला की सोनमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं.
असं काय करायचा मनोज
मनोज रात्रभर गायब होऊ लागला. सोनम रात्रभर त्याची वाट पाहत जागी असायची. पण तो दुसऱ्या दिवशी घरी यायचा. आपल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत, रात्री तो तिच्याकडे जातो असा संशय सोनमला आला. तिनं त्याला याबाबत विचारलं, तर त्याने तिला मारहाण केली. तो तिला आपल्या फोनलाही हात लावू द्यायचा नाही. एकदा तिनं त्याच्या फोनला हात लावला, तेव्हाही त्यानं तिला मारहाण केली.
अखेर सोनमनं संपवलं आयुष्य
सोनमनं नवऱ्याबाबत घरच्यांकडेही तक्रार केली होती. सोनमच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो तिच्यापासून अनेक गोष्टी लपवायचा मनोजने तिचा छळ सुरू केला होता. सोनमने पतीचा अत्याचार सहन न झाल्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ट्रॅकवर सोनमच्या पर्समधून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. लग्नानंतर एका महिन्याने सोनमनं आपलं आयुष्य संपवलं. सोनमच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह बिहारहून अलवरला आणला.
लग्नानंतर आठवड्यातच पतीने पत्नीला खोलीत कोंडलं
फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटकातही एक धक्कादायक घटना समोर आली होती. म्हैसूर जिल्ह्यातील हिरेगे गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 12 वर्षे तिला नजरकैदेत ठेवलं होतं. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री घरावर छापा टाकून पीडित सुमाची सुटका केली आणि आरोपी सन्नलैयालाही अटक केली.सुमा ही आरोपीची तिसरी पत्नी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. लग्नाच्या दिवसापासून तो तिच्यावर संशय घेत होता. लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात त्याने तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. त्याचा छळ सहन न झाल्याने पहिल्या दोन बायका आरोपीला सोडून गेल्या होत्या. पतीने दाराला तीन कुलूप लावून पत्नीला कोणाशीही बोलू नकोस असं बजावलं. तसंच तिला घराबाहेरील शौचालयाचा वापर करण्यास मनाई केली. यासाठी आरोपी खोलीत बादली ठेवून त्याची विल्हेवाट लावत असे. यामुळे पीडितेच्या नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.