Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दादा कोंडके आणि सम्गलर हाजी मस्तानच्या मत्रीचे न एकेलेले किस्से

दादा कोंडके आणि सम्गलर हाजी मस्तानच्या मत्रीचे न एकेलेले किस्से 


मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेता दादा कोंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजेच स्मगलर हाजी मस्तान हे एकमेकांचे चांगले मित्र होते, हे कोणाला माहित होतं का? तर त्यातही खूप कमी लोकांना त्यांच्या या मैत्रीविषयी माहित आहे. तर त्याविषयी दादा कोंडके यांच्या 'एकटा जीव सदाशिव' या आत्मचरित्रात या मैत्रीबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की या दोघांची भेट कधी आणि कशी झाली असेल? त्याशिवाय त्यानंतर त्यांची मैत्री कशी झाली... चला तर या सगळ्याविषयी जाणून घेऊया. 


दादा कोंडके आणि हाजी मस्तानी यांची ओळख ही त्यावेळेचे महाराष्ट्राचे मंत्री वसंतदादा यांच्यामुळे झाली होती. दादांच्या 'सोंगाड्या' या चित्रपटाच्या ज्युबिली कार्यक्रमात वसंतदादा हे हाजी मस्तानला घेऊन आले होते. तिथे त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर हाजी मस्तान अनेकदा दादा कोंडके यांना भेटण्यासाठी त्यांच्या ताडेदवच्या ऑफिसमध्ये जायचे. त्यावेळी त्यानंही 'शकील पिक्वर्स' नावानं प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. तर त्याचं ऑफिस हे दादा कोंडके यांच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर होतं. अनेकांनी दादा कोंडके यांना त्याच्या हाजी मस्तानपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. तर त्यावर दादा कोंडके म्हणाले होते की मैत्रीशिवाय हाजी मस्तानशी माझा काहीही व्यवहार नव्हता, त्यामुळे मला घाबरण्याचं काही कारण नाही.

एकदा मात्र, दादा संकटात पडता पडता वाचले. एक दिवस दादा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते. तेवढ्यात एक मुलगा दादांना भेटायला आलो म्हणतं आत आला. जो मुलगा आत आला, त्यानं आल्याबरोबरच आपल्या जॅकेटमधून सोन्याची बिस्किटं पटापट काढली आणि दादांसमोर टेबलावर ठेवली. दादांच्या टेबलावर बिस्किटांचा अक्षरश: ढीग पडला. हे पाहून दादा कोंडके यांना आश्चर्य झाले. 

15 लाखांची सोन्याची बिस्किटं

सोन्याची बिस्किटं देणारा मुलगा म्हणाला, '15 लाख का माल है, पर आप इसका आठ लाख दे दो,' दादा कोंडके त्याला म्हणाले, मैं नहीं लेता ऐसा माल.' पण त्याचा आग्रह चालूच होता. 'ले लो साहब, इतने कम पैसे मैं बेच रहा हूँ' त्याला पैशांची फार गरज होती का काय देव जाणे, पण थोड्या वेळानं तो एक लाख रुपयांला मला ती सर्व बिस्किटं द्यायला तयार झाला. 'अभी एक लाख रुपया दो, मैं चला जाता हूं.'

दादांनी त्याला टाळण्यासाठी म्हटलं "बाद में सोचेंगे, मेरे पास अभी पैसे नहीं हैं और मैं ये धंदा नहीं करता. 'नहीं नहीं, बादमे नहीं, मुझे अभी चाहिए,' त्याला भलतीच घाई होती. कोण कुठचा माणूस, पोलीस भानगड, चौकशी या भीतीने दादांनी धास्तावले. तरी तो तासभर थांबला आणि शेवटी निघून गेला." 

काही दिवसांनी हाजी मस्तान हा दादा कोंडके यांना भेटायला आला आणि त्यानं विचारलं की कोणता मुलगा तुमच्याकडे चौकशी करायला आला होता का? दादांनी त्यावर उत्तर दिलं की हो. काही दिवसांनी हाजी मस्ताननं त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी समजली आणि दादा कोंडके यांना आपण घेतलेला निणर्य योग्य होता याची जाणीव झाली होती आणि मोठ्या संकटातून वाचलो म्हणून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.