कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवार १६ एप्रिल २०२४ रोजी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे सकाळचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर देवीच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येईल.
ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखा, औरंगाबाद यांच्याकडील अधिकाऱ्यांमार्फत दि.१२ व १३ एप्रिल रोजी मुर्तीची पाहणी करुन व दि.१४ व १५ एप्रिल २०२४ रोजी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार , वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.