अरिहंत' मुळे 'सांगली'च्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा ;खासदार संजयकाका पाटील सांगली येथे श्री अरिहंत को-ऑप सोसायटी शाखेचे उद्घाटन
ज्या उद्देशाने सहकार क्षेत्रात वाटचाल करायची असते, हा उद्देश यशस्वी करण्यासाठी सहकार महर्षी रावसाहेब पाटील हे गेल्या अनेक दशकापासून प्रयत्न करीत आहेत. बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेने कर्नाटक राज्याबरोबरच आता जवळच्या महाराष्ट्र राज्यातही आपली शाखा प्रारंभ करीत आहे. अरिहंत सारख्या सहकारी संस्थांची या ठिकाणी नितांत गरज आहे. आज सांगली येथे अरिहंत शाखेचे उद्घाटन झाले असून, अरिहंत मुळे सांगलीच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेच्या सांगली येथे शाखेचा विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सहकार रत्न,युवा नेते उत्तम पाटील यांनी स्वागत केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब, सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ,कर्मवीर संस्थेचे चेअरमन रावसाहेब जी. पाटील, द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, राजवीर पाटील व संजय पाटील यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तर सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सेफ लॉकरचे उद्घाटन करण्यात आले.
नव्या ठेवी व नव्या योजनेसह आपण मल्टीस्टेटच्या माध्यमातून सांगली येथे आपली शाखा प्रारंभ केली आहे. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागासह शहराच्या अर्थकारणाला चालना मिळत असते. याचबरोबर येथील सभासद, व्यापारी, शेतकरी, उद्योग, व्यवसाय व विविध क्षेत्रांना वेळेत पत मिळवून देऊन त्याची आर्थिक परिस्थितीत भर पडावी या ठिकाणी शाखेची उद्घाटन केले असून सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास माजी मंत्री श्रीमंत पाटील , कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील ,नरसगोंडा पाटील,माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी ,उल्हास चिपरे ,पृथ्वीराज पवार, विशाल पाटील ,माजी महापौर सुरेश पाटील , क्रीडाई चे अध्यक्ष जयराज सगरे ,प्रशांत पाटील मजलेकर, डॉ.अजित पाटील, दिग्विजय पाटील, गौतम झेले,बाहुबली पाटील, रवींद्र खिलारे ,माणिक वाघमारे, शशिकांत राजोबा ,राहुल खंजिरे, संस्थेची सीईओ अशोक बंकापुरे, शाखाधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह सांगली ,मिरज ,कुपवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी, वसगडे, व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक ,पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली येथे श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखेचे उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, रावसाहेब जी .पाटील ,भालचंद्र पाटील, युवानेते उत्तम पाटील ,अभिनंदन पाटील व मान्यवर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.