बायकोचा खूप छळ केला, तिनं केली आत्महत्या पण हातावर जे लिहलं ते वाचून.......
इंदुर : वैवाहिक जीवनातील वादविवाद, मानसिक किंवा शारीरिक छळ, तसेच विवाहबाह्य संबंधांतून काही वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. या कारणांवरून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं काही प्रकरणांमध्ये दिसतं.
इंदूर शहरात याच कारणावरून एक गंभीर प्रकार घडला. येथील एका महिलेनं तिच्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या महिलेच्या आत्महत्येला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध तसेच त्याच्याकडून होणारा छळ कारणीभूत असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते. त्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तथापि, तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तेजाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्व्हर स्प्रिंग सोसायटीत राहणाऱ्या कविता पंकज पाटील (वय 40) या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. कविताचा मृतदेह सोमवारी दुपारी घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कवितानं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये तिने पंकज आणि त्याची मैत्रीण नम्रताच्या नावाचा उल्लेख करत त्या दोघांना मृत्युसाठी जबाबदार धरावं असं लिहिलं होतं. कवितानं मराठी आणि हिंदी भाषेत काही मजकूर लिहिला होता. त्यात तिने लिहिलं होतं की, `माझा पती पंकज आणि नम्रता यांच्यात खूप घट्ट नातं आहे. या कारणावरून माझा पती मला रोज मारहाण करत होता. पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.'
अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की, `शवविच्छेदनादरम्यान रुग्णालयात कविताच्या कुटुंबियांनी तिच्या पतीवर गंभीर आरोप केले.` पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नीला जाच करत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून कविताने आत्महत्या केल्याचे सुसाईट नोटवरून दिसते. या बाबतचा पोलीस तपास पूर्ण झाल्यावर घटनेमागील काही गोष्टी स्पष्ट होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.