सांगली 14 एप्रिल 2024:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले की आपणास देशाचे संविधान आठवते पण अन्य क्षेत्रात ही बाबासाहेबांचे योगदान फार महत्त्वाचे आहे जल आणि ऊर्जा यांचे महत्त्व त्यांनी जाणले होते, केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी 1947 रोजी जल आयोगाची स्थापना केली, भारत हा कृषिप्रधान देश आहे बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून आहे, त्यासाठी शेतीला पाणी देण्यासाठी धरणे बांधली पाहिजेत त्यापासून शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि उद्योगांना वीज मिळेल असे त्यांचे विचार होते. या भविष्यकाळाचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केले त्याबद्दल सर्व भारतीय त्यांचे कायम ऋणी राहतील असे विचार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आपले विचार मांडले.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, मुन्नाभाई कुरणे, सरचिटणीस विश्वजीत पाटील, मंडलाध्यक्ष रविंद्र सदामते, दलितमित्र अशोकराव पवार माजी नगरसेविका अप्सरा ताई वायदंडे, उदय मुळे, गौस पठाण, प्रियानंद कांबळे, राजू पठाण, मुकुंद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.