Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबाजोगाईला ७ एप्रिल रोजी मराठवाडा विभागीय गझल संमेलन

अंबाजोगाईला ७ एप्रिल रोजी  मराठवाडा विभागीय गझल संमेलन


अंबाजोगाई : गझल मंथन साहित्य संस्था आणि बीड जिल्हा कार्यकारिणीतर्फे अंबाजोगाई (जि. बीड) येथे दि. ७ एप्रिल रोजी मराठवाडा विभागीय एक दिवसीय गझल संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष जेष्ठ गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी असून उद्घघाटक म्हणून जेष्ठ गझलकार दगडूदादा लोमटे उपस्थित राहतील.
     
संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गझलकार दास पाटील आणि शिवदादा डोईफोडे उपस्थित राहणार आहेत. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे विभागीय स्तरावर एक दिवसीय गझल संमेलन आयोजित केले जात आहे. या संमेलनात होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद गझलकार रत्नाकर जोशी, डॉ. राज रणधीर, मुकुंद राजपंखे, शेखर गिरी, मारुती मानेमोड,आत्तम गेंदे भूषविणार आहेत. तर सूत्रसंचालन गझलकार दिवाकर जोशी, आर. के. आठवले, चंद्रकांत कदम, आत्माराम जाधव, बापू दासरी, अविनाश कासंडे करतील. 

या संमेलनात बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गझलकार सहभागी होणार आहेत. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. प्रास्ताविक अनंत देशपांडे करतील. मुख्य सूत्रसंचालन निशा चौसाळकर करतील. तर सजंय तिडके आभार मानतील.

 हे संमेलन ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नागापूरकर सभागृह, योगेश्वरी महाविद्यालय परिसर, अंबाजोगाई, जि. बीड येथे होणार आहे.  या संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे तसेच बीड जिल्हा कार्यकारिणी व मराठवाडा विभागीय कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

सौ. प्रणाली म्हात्रे
गझल मंथन जिल्हाध्यक्ष मुंबई.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.