नेस्लेनंतर आता एव्हरेस्टचा 'फिश करी मसाला' वादात
नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं आढळून आलं होतं. आता प्रसिद्ध एव्हरेस्टचा 'फिश करी मसाला' वादात अडकला आहे. सिंगापूर सरकारने भारतातून आयात केला जाणारा एव्हरेस्ट कंपनीचा फिश करी मसाला बाजारातून परत मागवण्याची घोषणा केली आहे. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सीला या मसाल्यात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं. इथिलीन ऑक्साईड (ethylene oxide) आरोग्यासाठी हानीकारक आहे. एसएफएने दिलेल्या माहितीनुसार इथिलीन ऑक्साईड हे कीटकनाशक आहे, जे अन्नात वापरण्यास परवानगी नाही.पण याचा वापर मसाल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
सिंगापूर सरकारने घेतला निर्णय
सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सीने (FSA) एक निवेदन जारी केलं असून यात 'हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा केंद्राने भारतातून आयात केलेला 'एव्हरेस्ट फिश करी मसाला' परत मागवण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली आहे. मसाल्यात इथिलीन ऑक्साई़डची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं यात आढऊन आलं होतं. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सीने आयात-निर्मात करणारी कंपनी स्पे. मुथैया अँड सन्स प्राइव्हेट लिमिटेडला Sp Muthiah & Sons Pte. Ltd) बाजारातून मसाले परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.
इथिलीन ऑक्साइड कीटनाशक
एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यात आढळलेलं इथिलीन ऑक्साइड हे एक किटकनाशक आहे. सामान्यतः याचा उपयोग शेतातील पिकांचं जंतूपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. पण खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर करण्यास परवानगी नाही. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सी (FSA) नुसार, सिंगापूरच्या अन्न नियमांनुसार मसाल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी इथिलीन ऑक्साईडचा वापर करण्यास परवानगी आहे. पण मसाल्यांमध्ये त्याचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलं आहे.
इथिलीन ऑक्साईड खाणं किती धोकादायक?
मसाल्यात इथिलीन ऑक्साईडची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ते काण्याने आरोग्यास कोणताही धोका नाही. पण केमिकल्स जास्त काळ खाल्ल्याने मनुष्याच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे सिंगापूर सरकारने मसाले विकत घेणाऱ्यांनी तो जेवणात वापरू नये, असा सल्ला दिला आहे. मसाला खाल्ला असेल आणि तुमच्या आरोग्याबाबात काही समस्या वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणी WION या संलग्न वेबसाइटने एव्हरेस्ट मसाला कंपनीकडून प्रतिक्रिया मागितली होती. पण अद्याप एव्हरेस्टकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.