सन्मान तिच्या प्रतिभेचा !!!साहित्यसंपदातर्फे समाजात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव
सन्मान तिच्या कर्तृत्वाचा -समाजात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा साहित्यसंपदातर्फे सन्मान जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून समाजात विशेष योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येतो .यंदाच्या महिलादिनाला जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण डोंबिवली येथील गणेश मंदिर येथे पार पडले.
माय माती फौंडेशन संस्थापिका आणि वृक्ष लागवड चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या ,आदिवासी मुलांसाठी विशेष उपक्रम राबविणाऱ्या प्रभावती पाटील (धामणगाव -जळगाव ) ,आकाशवाणीच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रचारास हातभार लावणाऱ्या पूजा काळे (मुंबई ) ह्यांना "साहित्यसंपदा भूषण " पुरस्कार प्रदान करण्यात आला .
महाराष्ट्रातील अनेक गझलकारांना मार्गदर्शन करणाऱ्या ,गझल प्रचार प्रसार करताना साहित्यक्षेत्रास आपले बहूमूल्य योगदान देणाऱ्या गझल गुरु उर्मिला बांदिवडेकर(नवीमुंबई) ह्यांना "साहित्य दीपस्तंभ" पुरस्कार बहाल करण्यात आला.
तसेच साहित्यक्षेत्रात वैयक्तिक उत्तम कामगिरी पार पाडत आणि अनेक समूहांच्या माध्यमातून लिह्त्या हातांना बळ देणाऱ्या दीपा वणकुद्रे (मुंबई ),गीतांजली वाणी(मुंबई ) ,अश्विनी अतकरे(अमरावती ),मुग्धा कुंटे(मुंबई ) ह्यांना "साहित्य प्रभा" पुरस्कार प्रदान करण्यात आला.रायगड भूषण सुप्रसिद्ध कवी लेखक रमेश धनावडे ,सुप्रसिद्ध गायक संतोष सकपाळ ,लेखक कवी श्रीकांत पेटकर ह्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा रंगला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली मोहिते ह्यांनी केले.मनोमय मीडिया ह्यांनी नियोजनाची जवाबदारी सांभाळली. सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी आभार मानले. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.