Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाला सांगलीत मोठा धक्का! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला रामराम :, विशाल पाटील यांना पाठिंबा देणार

भाजपाला सांगलीत मोठा धक्का! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला रामराम :, विशाल पाटील यांना पाठिंबा देणार 


सांगली लोकसभा निवडणुकीची  सध्या राज्यभर चर्चा आहे. एकीकडे महविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपमध्ये सगळं आलबेल नाही. सांगली लोकसभा निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा आहे. एकीकडे महविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपमध्ये सगळं आलबेल नाही. जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सोमवारी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, त्यांच्यासोबत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी संजयकाकांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता. तसेच खासदार संजय राऊत त्यांना महविकास आघाडीचे वास्तव सांगत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता.

भाजपमध्ये खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी मिळताच जत तालुक्यात त्यांच्या विरोधात कार्यकर्ते तयार असल्याचा आरोप करत विलासराव जगताप यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध केला होता. त्यावेळी संजयकाका गटाने त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, पक्षाने तशी कारवाई न करता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे.

यामध्ये म्हटलं की, "भारतीय जनता पार्टीमध्ये मी, आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले आहे. परंतु, पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आले. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो. तरी मी आपल्या भाजपचा राजीनामा देत आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.