बिर्याणीतून गुंगीचे औषध देवून एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार मीरा रोड येथे घडला आहे. एवढेच नाही तर या तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव देखील टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी ऐवढ्यावरच थांबले नाही तर पीडितेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये देखील उकळण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तरुणीचे केस काढून तिला विद्रुप केले होते. धक्कादायक अशा या प्रकरणी नया नगर पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता 26 वर्षाची असून ती मीरा रोड परिसरात राहते. गेल्यावर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये तिची ओळख कल्याणमधील 22 वर्षीय मोहसीन शेख या तरुणाशी झाली. पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहसीन याने पीडितेला बिर्याणीत गुंगीचे औषध घालून तिला खायला दिली होती. ही बिर्याणी खाऊन आपण बेशुद्ध झाल्याचे पिडीत तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
तरुणी बेशुद्ध अवस्थेत असताना मोहसीन याने तिच्यावर अत्याचार केला व तिची अश्लील छायाचित्रे काढली. हे फोटो दाखवून तो तरुणीवर वारंवार अत्याचार करत होता. त्यानंतर तो तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तिला मारहाण करू लागला व तिचे केस कापून तिला विद्रुप केली. तिच्याकडून वेळोवेळी पावणे तीन लाख रुपये उकळल्याचा आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.दरम्यान, आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख यांनी देखील तरुणीचा विनयभंग केला. तर काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीनची आई शहनाज देखील इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तरुणीवर दबाव टाकत होती, असे पिडीत तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, नया नगर पोलिसांनी मोहसीन शेखसह 6 जणांविरोधात विविध कलमांतर्गत केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील 6 आरोपिंपैकी मुख्य आरोपी मोहसीन शेख याला अटक करण्यात आल्याची माहिती नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.