Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पित्त होण्याची कारणे अन उपाय.....?

पित्त होण्याची कारणे अन उपाय.....?


आहार...

तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.

अपेय पान...

आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.

ऊन सहन न होणे...

जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.

भावनिक ताण... 

कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय...

अमृत फळ आवळा...

चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो.

मूग आणि तांदूळ...

जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.       

उष्ण आलं आणि रसदार लिंबू...

आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते.

जेवणात आलं घ्यावं. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.

कोकम...

आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील प्रचुर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते.

थंड दुध...

थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित खडीसाखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.

पिकलेले केळे...

केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल  निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते.

डॉ. प्रमोद ढेरे,



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.