Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रक्ताची अशुध्दी

रक्ताची अशुध्दी

आपण बर्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त झाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा…. अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छास गरजेचा आहे तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह. 

तर आज काही वीणाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करू शकतो. 

🩸 दररोज किमान ३ खजुर खाणे. 

🩸 महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे. 

🩸 आठवड्यातुन किमान एकवेळेस जेवणानंतर पान खावे. 

🩸 दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे. 

🩸 सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे त्यानंतर १ तासाने कोमट पाणि घ्यावे. 

🩸 टॅामेटो - गाजर - बीट इत्यादी सॅलाड दररोज दुपारी किमान एकवेळेस तरी घ्यावे. 

🩸 शीर्षासन ५ मीनीट व पायांच्या टाचेवर ५ मी. उभे राहावे. 

🩸 महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे. 

🩸 महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, दुध व पाणि चालेल. 

🩸 महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळीमिरी ची पावडर व काळेमिठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे. 

🩸 पहाटे लवकर उठून १० मीनीट प्राणायाम करावा. 

🩸 ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी  बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्यासोबत. 

🩸 स्रीयांनी मासिक नंतर व त्याआधीच्या त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धाग्लास कोमट पाण्यात काळेमिठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी होतेच शिवाय शरिरातील विषाणु तत्वे हि नाहिशी होतात. 

🩸 दररोज कमीत कमी २० मीनीट चालावे. 

🩸 कडधान्ये, पालेभाज्या, तुप, काळेमिठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच शिवाय अशक्तपणा हि जातो. 

🩸 आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०/२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. दररोज केल्यास उत्तमच. 

🩸 कोणत्याही आहारामध्ये थोडीशी सुंठ वापरावी. 

वरील काही मोजके उपाचार सुचवले आहेत, याव्यतिरिक्त अनेक असे घरगुती उपाय आहेत ज्याने असाध्यरोगांवर मात करण्यास आपण आपल्या शरिराला मदत करू शकतो. परंतु ते सर्व लिहिणे शक्य नाही, तेव्हा वरील पैकी कोणतेही जे सहज शक्य असतील ते उपाय करून स्वताला व परिवाराला निरोगी करूया. 

निरोगी रहा आनंदी रहा 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.