अमरावतीसह अन्य ठिकाणचे शिवसैनिकही नाराज आहेत. आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करावी, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला थेटपणे सांगितले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. त्यात ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ठाकरे गटाने सांगली लोकसभेच्या जागेवर दावा करत डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यावरूनच काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेत ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये चार नावांचा समावेश आहे. यात बहुचर्चित कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे यांनी हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे.
सांगलीबाबत पुनर्विचार नाही
यावेळी त्यांनी त्यांनी सांगलीच्या जागेचा पुनर्विचार होणार नाही. अमरावतीसह अन्य ठिकाणचे शिवसैनिकही नाराज आहेत. आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करावी, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला थेटपणे सांगितले आहे.
मैत्रीपूर्ण लढत होत नाही, एकतर मैत्री करा किंवा…
यावर, मैत्रीपूर्ण लढत होणार का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री करा किंवा थेट लढत द्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले. सांगलीचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. आताही चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. लवकरच संजय राऊत तिथे जाणार आहेत. आम्ही तिथे प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अन्य ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत. पण काँग्रेसचे उमेदवार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.