Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय उपचारासांठी 'ही' सरकारी बँक देईल मदतीचा हात; पहा कसा मिळेल लाभ?

 वैद्यकीय उपचारासांठी 'ही' सरकारी बँक देईल मदतीचा हात; पहा कसा मिळेल लाभ?

(Canara Heal Scheme) आयुष्यात कोणती परिस्थिती कशी आणि कधी येऊन समोर उभी राहील, याचा काही नेम नाही. कधीही काहीही घडू शकत. यामध्ये बऱ्याच लोकांनी आपत्कालीन परिस्थितीचा अनुभव घेतला असेल. अशा परिस्थितीत मानसिक आणि आर्थिक स्थैर्य आवश्यक ठरते. आपात्कालीन परिस्थितीबाबत बोलताना सगळ्यात आधी वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी लागणारा खर्च समोर दिसू लागतो. या दृष्टिकोनातून विचार केला तर हॉस्पिटल इमर्जन्सी कधीही येऊ शकते आणि अशावेळी होणारा खर्च टाळता येणारा नसतो.

अशा आपात्कालीन परिस्थितीत अनेक लोकांना आरोग्य विमा (Canara Heal Scheme) कामाचा ठरतो. पण कधी कधी उपचारादरम्यान मेडिक्लेमच्या लिमिटपेक्षा जास्त खर्च होतो. तर काही लोकांकडे कुठल्याही प्रकारचा विमा कव्हर नसतो. अशावेळी जर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची वेळ आली तर हतबल झाल्यासारखे वाटते. या परिस्थितीत एखाद्याचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. अशी भयानक परिस्थिती कुणावरही ओढवू नये म्हणून कॅनरा या सरकारी बँकेने एक योजना सुरु केली आहे. ती योजना काय आहे आणि कशी मदत करते? याविषयी जाणून घेऊया.

कॅनरा बँकेची नवी योजना 

आपत्कालीन परिस्थिती दवाखान्याचा, औषधाचा खर्च करण्यासाठी पैसा अपुरा पडत असेल तर आपण कॅनरा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता. तशी या सरकारी बँकेने नवी योजना सुरु केली आहे. 'कॅनरा हिल' असे या योजनेचे नाव आहे. जी आरोग्यासाठी कर्ज प्रदान करते. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना पैशाची अडचण आली तर कॅनरा बँकेच्या या कर्ज योजनेचा लाभ घ्या.

कर्जाचे २ प्रकार

कॅनरा बँकेने ही आरोग्य विमा योजना अशा ग्राहकांसाठी सुरु केली आहे ज्यांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या मंजूर विमा रकमेपेक्षा जास्त आहे. या कर्ज योजनेत २ महत्वाचे प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे फ्लोटिंग. याचा अर्थ बदलत्या व्याजदर आधारे कर्ज. तसेच दुसरा प्रकार आहे स्थिर. म्हणजेच निश्चित व्याजदराच्या आधारे कर्ज. (Canara Heal Scheme) यातील फ्लोटिंग प्रकारात व्याजदराच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कर्जावर ११.५५ टक्के वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तर निश्चित व्याजदरावर आधारलेल्या कर्जासाठी १२.३० टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

महिलांना विशेष लाभ

कॅनरा बँकेने महिलांसाठी बचत खाते उघडण्याची प्रक्रिया नि:शुल्क ठेवली आहे. त्यामुळे महिला ग्राहक कॅनरा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बचत खाते नव्या पर्यायात हस्तांतरीत करु शकतात. तसेच बँकेने कॅनरा युपीआय 123 पे ASI आणि बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी कॅनेरा HRMS मोबाईल ॲप सुरु केले आहेत. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.