Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जैन धर्मातील संतांची सरस्वती साधना काय आहे? मुलांनाही दयावी लागते कठीण परीक्षा

जैन धर्मातील संतांची सरस्वती साधना काय आहे? मुलांनाही दयावी लागते कठीण परीक्षा 


जैन धर्मातील प्रसिद्ध धर्मगुरू आणि अवघ्या 12 व्या वर्षी संन्यास दीक्षा घेणारे जैन मुनि अजितचंद्र सागर महाराज यांनी सरस्वती साधनेचा शोध लावला आहे. त्यांच्या नावावर यापूर्वीच अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. जैन मुनि अजितचंद्र सागर यांनी 8 वर्षापर्यंत मौन व्रत धारण केलं होतं. त्यांना 23 आगमांच्या 22 हजार गाथा कंठस्थ आहे. अभ्यासू, तत्त्वज्ञानाचा अचूक निष्कर्ष काढणारे मुनि म्हणूनही त्यांचा विशेष उल्लेख केला जातो.

मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये 3000 प्रेक्षकांच्या समोर त्यांनी 200 अवधान (ध्यानाचा प्रकार) केला होता. मुंबईच्या एनएससीआय स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या समोर 500 अवधानाचा त्यांनी विक्रम केला होता. महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांसह 15 उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही हे पाहण्यासाठी पोहचले. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचे गुरु नयनचंद्रसागर सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आत्मविश्वासाचा अद्भुत चमत्कार दाखवला.

जैन मुनिने 1500 प्रेक्षकांसमोर अगोदर 100 अवधान केले. 100 अवधान म्हणजे उपस्थित असलेल्यांनी सांगितलेल्या 100 गोष्टी काहीही न लिहिता लक्षात ठेवणे आणि नंतर त्या सर्व गोष्टी त्याच क्रमाने पुन्हा करणे. आजकालच्या जगात दहा अंकी मोबाईल नंबर देखील लोकांना लक्षात राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो.

हजारो लोकांच्या गर्दीत एकाच वेळी सांगितलेल्या 500 गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्याच क्रमाने पुन्हा सांगणे ही काही चमत्कारापेक्षा कमी गोष्ट नाही. जैन मुनि अजितचंद्र सागर महाराज याला चमत्कार अजिबात मानत नाहीत, त्यांच्या मते ही एक साधना आहे जी कठोर तपश्चर्या, योगासने आणि कठोर परिश्रमाने साध्य करता येते. संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी सरस्वती साधनेचा शोध लावला आहे.

एक अशी साधना ज्याच्या मदतीने कोणताही विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकेल आणि अपयशी होणार नाही. जगभरातील 50 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी सरस्वती साधनेचा प्रयत्न केला आहे. सहस्त्रावधान म्हणजे वेगवेगळ्या श्रेणीतील आणि प्रत्येक वर्गातील लोकांनी सांगितलेल्या 1000 गोष्टी किंवा प्रश्न आणि उत्तरे लक्षात ठेवणे आणि त्याच क्रमाने पुनरावृत्ती करणे.

600 वर्षांपूर्वी जैन गुरु भगवंत श्री मुनि सुंदर सुरीजी महाराज यांनी असा इतिहास घडवला होता आणि 21 व्या शतकात पुन्हा एकदा असाच घडणार आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय स्टेडियमवर हजारो लोकांच्या उपस्थितीत जैन मुनि अजितचंद्र सागर या विक्रमाची पुनरावृत्ती करतील. 1 मे 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात देशातील अनेक मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विविध क्षेत्रातील विचारवंत उपस्थित राहणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.