Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपची दहावी यादी जाहीर

भाजपची दहावी यादी जाहीर


नवी दिल्ली:  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीमध्येही साताऱ्यातून इच्छूक अससलेले उदयनराजे यांचं नाव नाही. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

भाजपने 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून चंदीगड मतदारसंघातून किरण खेर यांचे तर अलाहाबाद मतदारसंघातातून पक्षाने रिटा बहुगुणा यांचे तिकीट कापले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील मैनपुरी मतदारसंघात डिंपल यादव यांच्याविरोधात जयवीर सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे.


चंदीगडमध्ये अभिनेत्री किरण खेर यांच्याऐवजी संजय टंडन यांना पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून अलाहाबादमध्ये रिटा बहुगुणा यांच्याऐवजी नीरज त्रिपाठी यांना संधी देण्यात आली आहे. त्रिपाठी हे भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. केसरीनाथ त्रिपाठी यांचे पुत्र आहेत.

बलिया मतदारसंघात वीरेंद्रसिंह मस्त यांचे तिकीट कापत माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना संधी दिली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी मतदारसंघात विनोद सोनकर, मछली शहर मध्ये बी. पी. सरोज तर गाजीपूर मतदारसंघात पारसनाथ राय यांना तिकीट देण्यात आले आहे. राय यांची लढत सपाचे विद्यमान खासदार अफजाल अन्सारी यांच्याशी होईल. प. बंगालमधील आसनसोल मतदारसंघात भाजपने एस. एस. अहलुवालिया यांना तिकीट दिले आहे. भाजपची ही दहावी यादी असून त्यात चंदीगडमधील जागेशिवाय उत्तर प्रदेशातील सात तर प. बंगालमधील एका जागेचा समावेश आहे.

आसनसोल मतदारसंघासाठी याआधी भाजपने प्रसिध्द भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचे नाव जाहीर केले होते. मात्र नाव जाहीर झाल्याच्या चोवीस तासात त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाने माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्यावर विश्वास टाकला आहे. अहलुवालिया यांची लढत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होईल. अहलुवालिया यांनी गतवेळी वर्धमान-दुर्गापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळी प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष वर्धमान-दुर्गापूरमध्ये लढत देत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.