महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेले राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना न्यायालयाने झटका दिला आहे. लैंगिक छळासंबंधीच्या प्रकरणात नव्याने चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सिंह यांनी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली आहे.
ऑलिम्पिकपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह इतर काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याविषयी आरोप निश्चिती व्हावी यासाठी दिल्लीच्या स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोणतेही आदेश देण्यापूर्वी काही पैलूंबाबत अधिक तपास व्हावा, अशी मागणी सिंह यांनी केली होती. तसंच, या प्रकरणात नव्याने तपास सुरू करण्याची मागणी करणारी याचिका सिंह यांनी दाखल केली होती.आपल्यावरील आरोपांविषयी युक्तिवाद सादर करण्यासाठी तसंच पुढील तपासासाठी अधिक वेळ द्यावा, अशी विनंती सिंह यांनी केली होती. मात्र, ती याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. या प्रकरणातील पुझील सुनावणी आता 7 मे रोजी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.