Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: विवाहीता शीतल लेंडवे हिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

सांगली: विवाहीता शीतल लेंडवे हिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा


खेराडे वांगी येथील विवाहिता शीतल अनिकेत लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मयत शीतलचे बंधू सूरज मधुकर सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.  त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, आपली बहीण शीतल व सांगली येथील डॉ. अशोक लेंढवे यांचे चिरंजीव अनिकेत यांचा विवाह १५ फेब्रुवारी २०१३ रोजी झाला होता. विवाहानंतर शीतल हिला अन्वी ही दहा वर्षांची मुलगी आहे. तसेच अद्याप मुलगा नसल्याने तिला सासरचे लोक जाणीवपूर्वक त्रास देत होते. तिचे दोनवेळा गर्भपात झाल्याने दुसऱ्या मुलाचा चान्स घेऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आपला वंश वाढणार नाही या गैरसमजातून सासरे डॉ. लेंढवे व सासू अनिता लेंढवे हे दोघे शीतलला वारंवार त्रास देत होते. त्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये शीतल माहेरी आली होती. त्यानंतर पै-पाहुण्यांनी मध्यस्ती केल्यानंतर ती पुन्हा सासरी गेली.




२९ मार्च २०२४ रोजी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यासंदर्भात सासू अनिता यांनी शीतलची आई सौ. छाया सूर्यवंशी यांना फोन केला होता. त्यामध्ये शीतलने नवऱ्याच्या थोबाडीत मारून कोंडून घेतले आहे. तिच्या जीवितास बरेवाईट झाल्यास सर्वस्वी तीच जबाबदार असेल, असे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने शीतलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन आला. त्यानंतर सांगली येथे तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

याबाबत चार दिवसांनी विचारणा केली असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सासरच्या छळास कंटाळूनच शीतलने आत्महत्या केली आहे. आत्महत्येस कारणीभूत असणारे पती, सासू-सासरे व इतर नातेवाईकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. गृहमंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षा, पालकमंत्री तसेच विभागीय पोलीस निरीक्षकांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

वाढदिवसाच्या खर्चावरून वाद

नेमका प्रकार काय घडला याबद्दल भाची अन्वी हिला विचारले असता तिने सांगितले, की आपल्या वाढदिवसाला जास्त खर्च झाला म्हणून आजी व मम्मीमध्ये आठ दिवस रोज भांडण होत होते. मृत्यूच्या दिवशी हात दुखत असल्याने शीतल झोपली होती. ती उशिरापर्यंत झोपली म्हणून पती-पत्नीत जोराचे भांडण झाले. बाबाने मम्मीच्या कानफटीत मारली व मंगळसूत्र तोडून टाकले. मम्मीने बाबांचे बनियन फाडले. त्यावेळी आज्जीही वरती आली व तिनेही मम्मीला शिवीगाळ करत तिचे केस ओढले. मला फोन देऊन खाली गेम खेळण्यास पाठविले. त्यानंतर मम्माचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. नंतर आजी, बाबा खाली आले व चहा पिले. त्यांनी आजोबा व चुलत्यांना फोन करून बोलावून घेतले. चुलत्यासोबत चुलतीही घरी आली. वरच्या खोलीत बसून सर्वांनी चर्चा केली व मम्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, असेही निवेदनात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.