Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सासुरवाडीत आलेल्या जावयाला बेदम मारहाण करून खून पत्नीसह सासरा, मेहुण्यावर गुन्हा दाखल

सासुरवाडीत आलेल्या जावयाला बेदम मारहाण करून खून पत्नीसह सासरा, मेहुण्यावर गुन्हा दाखल


अहमदनगर :  सासुरवाडीला कार्यक्रमासाठी आलेल्या जावयाला दारू पाजून मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना केडगाव उपनगरात घडली. प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय 28, रा. केळ पिंपळगाव ता. आष्टी) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. त्याचा मृतदेह पाथर्डी रस्त्यावर चाँदबिबी महाल परिसरात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे.


याप्रकरणी प्रशांत यांचा चुलत भाऊ किशोर बापुराव घाटविसावे (वय 36, रा. केळ पिंपळगाव) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून प्रशांतची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे, सासरा सोमनाथ बनकर, मेहुणा अजय सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेहुणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

प्रशांत आणि कल्याणी यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. त्यानंतर ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कल्याणी घाटविसावे व अजय बनकर यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.