Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झोमॅटोवरुन ऑर्डर पडणार महागात; प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ

झोमॅटोवरुन ऑर्डर पडणार महागात; प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली:  झोमॅटोने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे प्रत्येक ऑर्डरवर पाच रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनी आपल्या मार्च तिमाहीतील कामगिरीची घोषणा करणार आहे. पण, त्याआधीच कंपनीने शुल्कवाढीची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापुढे आता झोमॅटोची इंटरसिटी लिजेंड्स फूड डिलीव्हरी सेवादेखील उपलब्ध होऊ शकणार नाही.

ऑगस्ट २०२३ मध्ये कंपनीने नफा कमावण्यासाठी प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये २ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतरपासून यात दोनदा वाढ करण्यात आली होती. झोमॅटो दरवर्षी जवळपास ८५ ते ९० कोटी ऑर्डर घेते. केवळ एक रुपया सुविधा शुल्क आकारल्याने कंपनीच्या उत्पन्नामध्ये ८५ ते ९० कोटी रुपयांचा फरक पडतो.

झोमॅटोने इंटररिटी लिजेंड्स सेवा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेअंतर्गत कंपनी एका शहरातील टॉप रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थ दुसऱ्या शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑर्डर स्वीकारायची. मात्र, सध्या ही सेवा थांबवण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर 'लिजेड्स' वर क्लिक केल्यावर सेवा तात्पुरती स्थगित असून आम्ही लवकरच तुमच्या सेवेत येऊन अशी सूचना पाहायला मिळत आहे.

शेअर्समधून चांगला परतावा

झोमॅटो कंपनीने डिसेंबर महिन्यातील तिमाहीमध्ये उत्पन्नामध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीचे एकून उत्पन्न २,०२५ कोटी इतके आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यात कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या शेअर्सनी यावर्षी जवळपास ५१ टक्क्यांनी वाढ नोंदवली. गेल्या वर्षी शेअर्स धारकांना २३६.६१ टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. सध्या झोमॅटोच्या एका शेअर्सची किंमत १८९ रुपयांच्या जवळ आहे.

दरम्यान, झोमॅटो कंपनी अनेक कारणांसाठी चर्चेत राहते. खास करुन झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. काही दिवसांपूर्वी एका झोमॅटो बॉयने ग्राहकाच्या घराबाहेरील चप्पल चोरली होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटोने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोड बदलला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.