Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : जिल्हा परिषदेच्या शाळेतील चमुकल्यानी भाजी - भाकरी बनवली चुमकल्याचा अनोखा उपक्रम

सांगली : जिल्हा परिषदेच्या शाळेतील चमुकल्यानी भाजी - भाकरी बनवली चुमकल्याचा अनोखा उपक्रम 


दरीबडची : साळमळगेवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत कुल्लाळवाडी पॅटर्नवर आधारित 'माझी भाकरी, भाकरी डे' उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांत श्रमाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, कौटुंबिक परिस्थितीची जाणीव, भाकरी करताना येणाऱ्या अडचणी आणि जबाबदारीचे भान या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले.


साळमळगेवाडी परिसरातील काही पालक ऊसतोडणी व इतर कामानिमित्त परगावी सहा महिने स्थलांतरित होतात. मुलांना घरी सोडून जातात. मुले शिक्षणासाठी आजी-आजोबा यांच्यासोबत शिक्षणासाठी घरीच राहतात. काही वेळा मुलांना अर्धवट शिक्षण सोडून आई-वडिलांसोबत जावे लागते. घरी आजी-आजोबांना मदत व्हावी. तसेच भाकरीचे महत्त्व कळावे. म्हणून हा उपक्रम शिक्षकाने राबविला. आई-वडील बाहेरगावी गेले, तर मुलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा. मुलांना स्वयंपाक करता यावा, या उद्देशाने मुलांनी 'माझी भाकरी' उपक्रम राबविला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती शिक्षकांनी दिली.

विद्यार्थ्यांनी घरातून पीठ, तवा, काटवट, जळण साहित्य आणले. मीठ, हळद टाकून पीठ मळले. आवारात, पटांगणावर तीन दगडांची चूल मांडली. कुरकुरीत पापडीसारख्या भाकरी बनविल्या. उपक्रमात दुसरीपासून ते आठवीपर्यंतची मुले सहभागी झाली. दोन वर्षांपूर्वी कुल्लाळवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांचा सप्टेंबर २०२१ मध्ये राबविलेला 'माझी भाकरी' हा उपक्रम राज्यभर गाजला होता. त्याची प्रत्यक्ष प्रचिती शाळेत अनुभवली.

नियोजन जिरग्याळ केंद्रप्रमुख रतन जगताप, मुख्याध्यापक मनोज वसावे, सहशिक्षक अशोक कदम, शहाजी वाघमारे, विद्याधर गायकवाड, सीताराम यादव, दादासाहेब कोडलकर, गोविंद फड, रामेश्वर करळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीराम पडोळे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख, शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी गवारी, पाटील हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले. वर्षभर अनेक उपक्रम कार्यक्रम घेऊन अध्यापन केले जाते. मुला-मुलींना भाकरी करता यावी. हे कृतीतून शिकण्यासाठी उपक्रम उपयोगी पडला, असल्याचे मत विद्यार्थिनी साक्षी कित्तुरे हिने व्यक्त केले.

मॉडेल स्कूल शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून, पटसंख्या २३० आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. आई-वडील भाकरीसाठी किती कष्ट करतात. हे मुलांच्या लक्षात आले पाहिजे, हा हेतू समोर ठेवून उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची व अभ्यासाची आवड निर्माण होते. - मनोज वसावे, वरिष्ठ मुख्याध्यापक

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.