वाईनच्या बाटलीचा तळ सपाट का नसतो? का असतो तो खड्डा?
नवी दिल्ली : दारू पिणारे ब्रँड आणि टाईप फक्त एक बाटली पाहूनच ओळखतील. ज्याप्रमाणे वाइन वेगळ्या प्रकारच्या बाटलीत ठेवली जाते, त्याचप्रमाणे रम किंवा वोडका वेगळ्या प्रकारच्या बाटलीत ठेवली जाते. जेव्हा आपण वाइनच्या बाटल्यांबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या विशेष आकाराची देखील चर्चा केली जाते. विशेषत: वाईनच्या बाटल्यांचा तळ इतर बाटल्यांप्रमाणे सपाट नसतो, तर तिथे तळाला खोल खड्डा असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, त्या इतर सामान्य बाटल्यांप्रमाणे तळाशी सपाट का नाहीत? याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो.
मेंटल फ्लॉस वेबसाइटच्या अहवालानुसार, वाइनच्या बाटलीच्या तळाशी तयार झालेल्या डिंपलला पंट म्हणतात. औद्योगिक क्रांतीपूर्वी सर्व काचेच्या बाटल्या हाताने बनवल्या जात होत्या. त्याकाळी बाटल्या बनवणारे या बाटल्या सरळ उभ्या राहण्यासाठी स्वतंत्रपणे हे पंट बनवत असत. आजकाल सर्व काचेच्या बाटल्या मशीनने बनवल्या जातात. या कारणास्तव आज त्या तळाशी सपाट देखील बनवल्या जाऊ शकतात. 200 वर्षांपूर्वी ते पूर्णपणे सपाट करणं कठीण होतं.
वाईनच्या बाटल्यांचे हे डिझाइन वर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये आहे, म्हणूनच त्याच्या निर्मात्यांना हे क्लासिक डिझाइन बदलायचे नव्हते. या कारणास्तव त्यांनी जुनी रचना कायम ठेवली. आता हा डेंट तयार होऊ लागल्याने वाइन उद्योगाशी संबंधित लोकांना अनेक पर्याय सापडले आहेत. या खड्ड्याच्या मदतीने लोक दारूच्या बाटल्या पकडतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जेव्हा दुसऱ्याच्या ग्लासमध्ये वाईन ओतली जाते तेव्हा अंगठा खड्ड्यात ठेवला जातो.
वाईनच्या बाटल्यांमधील खड्डे जितके खोल असतील तितकी कमी वाइन त्यामध्ये असते. अशा प्रकारे अनेकवेळा ग्राहकांची फसवणूकही केली जाते. पंट असण्याची ही सर्व कारणं आहेत, परंतु काही कारणं लोकांनी निर्माण केली आहेत, त्यामागे कोणताही ठोस पुरावा नाही. ही कारणे केवळ प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, खोल खड्ड्यामुळे वाइनची बाटली लवकर थंड होते किंवा खड्ड्यामुळे बाटलीतील गाळ काचेत पडत नाही. याशिवाय अनेक लोक म्हणतात की खड्ड्यामुळे बाटली जास्त प्रेशर सहन करू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.