Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात......शहरातील सोसायट्या आणि गावातील बोळही काढताहेत पिंजून

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात......शहरातील सोसायट्या आणि गावातील बोळही काढताहेत पिंजून 


बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये कधी नव्हे ते इतका राजकारणाला रंग चढलाय.. त्याचं कारणही तसंच आहे ... पवार विरुद्ध पवार हे इतिहासात पहिल्यांदाच समोरासमोर उभे ठाकले आहेत.नणंद विरुद्ध भावजयची लढाई आता चांगलीच रंगात आलीय.. कधी एकेकाळी बारामतीत कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ फोडल्यानंतर सांगता सभा घेतली किंवा नाही घेतली तरी तितकासा फरक पडत नव्हता. राज्यभर शरद पवार आणि अजित पवार हे इतर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झंजावात करत असत. तशा पद्धतीचे ते स्पष्ट बोलून दाखवत असत.

बारामतीकरांनो तुम्ही यापूर्वी सारखेच भरघोस मताने आपलं सीट निवडून द्या. आता मला वेळ मिळेल की नाही मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हेच माझे सांगणे, तुम्ही विचारपूर्वक ऐकून कामाला लागा. असे सांगून ते बारामतीतून राज्यभर दौऱ्यासाठी निघून जात असत.

मात्र आता पवार कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आणि एकेरी होणारी निवडणूक मात्र दोघांनाही घायकुतीला आणणारी ठरलीय..त्यात शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातली ही लढाई रंगतदार बनत चालली आहे. लेकीसाठी शरद पवार हे जुन्या सवंगड्यांना भेटून तर गनिमी कावा करत जुन्या नव्यांची सांगड घालत आपल्या लेकीसाठी काहींचा पक्षप्रवेश घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायेत..

तर दुसरीकडे काकांपासून फारकत घेऊन भाजप बरोबर सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट आपल्या बहिणीच्या विरोधात पत्नीला उभा करत आपली महायुतीची सर्व शक्ती आजमावून दाखवण्यासाठी अहो (पत्नी,)साठी काय पण यासाठी धडपडत करताना दिसतायेत. 

महाराष्ट्रभर उमेदवारांचे फड गाजवणारे महायुतीचे स्टार प्रचारक अजित पवार मात्र सध्या बारामतीतच अडकून पडल्याचे दिसून येतायेत. एखाद दुसरी सभा घेणारे अजित पवार आता गल्लीबोलात, सोसायटीत, विविध समाजाच्या बैठका, घराघरात जाऊन जास्तीचं लीड मिळवण्यासाठी प्रयत्न करतायेत

तर दुसरीकडे काकांपासून फारकत घेऊन भाजप बरोबर सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट आपल्या बहिणीच्या विरोधात पत्नीला उभा करत आपली महायुतीची सर्व शक्ती आजमावून दाखवण्यासाठी अहो (पत्नी,)साठी काय पण यासाठी धडपडत करताना दिसतायेत. 

महाराष्ट्रभर उमेदवारांचे फड गाजवणारे महायुतीचे स्टार प्रचारक अजित पवार मात्र सध्या बारामतीतच अडकून पडल्याचे दिसून येतायेत. एखाद दुसरी सभा घेणारे अजित पवार आता गल्लीबोलात, सोसायटीत, विविध समाजाच्या बैठका, घराघरात जाऊन जास्तीचं लीड मिळवण्यासाठी प्रयत्न करतायेत अजित पवारांना बारामती शहरातसह तालुक्यातच नव्हे तर लोकसभा मतदारसंघात देखील कधी इतके फिरताना पाहिले नव्हते असे लोक सांगतायेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.