Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संघर्षावर मात करीत, पत्रकारितेत स्वतःची पाऊलवाट निर्माण करणारा प्रकाश ' बापू 'कांबळे

संघर्षावर मात करीत, पत्रकारितेत स्वतःची पाऊलवाट निर्माण करणारा प्रकाश ' बापू 'कांबळे


कोणताही बारसा अथवा पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावर तब्बल ४१ वर्ष पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करून आपला वेगळा ठसा उमटविणारे प्रकाश कांबळे यांच्या पत्रकारितेकडे पाहिले असता कवीग्रेश कुसुमाग्रज यांची 'कोलंबसाचे गर्व गीत या नावाची सुंदा कवीता आठवते, ध्येय कर निश्चित असेल आणि त्यावर अपार निष्ठा असेल तर तिथे अपयशाला नाही असा संदेश कवीषेश कुसुमाग्रजयांनी कवीतेतून दिला आहे. प्रकाश कांबळे यांच्या पत्रकारितेकडे पाहिल्यानंतर मला हेथ नेहमी जाणवते. 


मळलेल्या पाऊलवाटेने सर्वचजण जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु नवीन पाऊलवाट निर्माण करणारी ही गोष्ट एखाद्या आव्हानासारखी असते. अशी पाऊलवाट निर्माण करताना जिद, चिकाटी आणि कशाची तयारी असावी लागते, पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रकाश कांबळे यांनी नवीन पाऊलवाट निर्माण करूनस्वतः च्यात्याचबरोबर अनेकांच्या जीवनात परिवर्तनाचा मार्ग खुला केला आहे असेच म्हणावे लागेल, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जो-तो स्वतःपुरते पाहतो, दुसन्यांचा विचार करायला त्यांना वेळ नहीं. आणि पत्रकार म्हटले तर पाहयला नको. परंतु या पत्रकारांचे कसे चाललेय? प्रसंगी प्राणाचा धोकाही पाकरून सामाजिक बांधिलकी जपणारे हे पत्रकार कशा पद्धतीने जगताहेत हे पाहयला कुणाला वेळही नाही. हा एवढा शब्द प्रपंच करायचे कारण एयवेच की, प्रकाश कांबळे या माझ्या पत्रकार मित्राचा दिनांक १६ एप्रिलला वाढदिवस असतो प्रकाशच्या बाबतीत सांगायचे झालेच ता प्रकाश हा स्याट बक्ता, सडेतोड बोलणारा, पोटात एक आणि ओठात एक ही त्याची प्रवृत्तीच नाही असेल ते स्पष्ट तोडावर बोलणारा, निखळ आणि निर्मळ... वाहत्या पाण्यासारखा स्वभाव... काठावरील सान्यांना हिरवाई देऊन स्थांना नदीच्या पाण्याप्रमाणे सुख देणारा प्रकाश... त्याची आणि माझी मैत्री अजोड आहे. कोगनोळी (ता. कवठे महांकाळ) ग्रामीण भागातील असणारा प्रकाश... द्वारिद्र पाचवीला पुजलेले... पण मुलाला मोठे करायचे ही त्याच्या आईची जिद्द... शांतीनिकेतन सारख्या त्याकाळच्या नामांकित महाविद्यालयात दहावीनंतरच्या शिक्षणासाठी प्रकाश दाखल झाला.... कोणताही गॉडफादर नसताना अथवा मार्गदर्शक नसताना त्याने सायन्सला प्रवेश घेतला. जेमतेम मार्कावर दहावी पास झालेल्या प्रकाशला सायन्सचे हे धनुष्य पेलले नाही... तो बारावी नापास झाला, भविष्यकाळ अंधारमय झाला. पुढे काय करायचे? या प्रज्ञाने त्याला ग्रासले. पण होल तो प्रकाश कसला. त्याने आपले नातेवाईक व मित्र राहत असलेल्या मिरज शहरातील त्यांच्या खोलीत आसरा घेतला आणि गावाकडून जेवण मागवून इथेच काहीतरी करू या उद्देशाने आपल्या नव्या उद्देशाला सुरुवात केली.

त्याला त्यावेळी बामसिंगर लायब्ररीचा आधार मिळाला. बाचनाची अफाट आवड असलेला प्रकाश नोकरीच्या गरजेपोटी नव्याने सुरू झालेल्या दैनिक प्रतिध्वनी या दैनिकात वार्ताहर म्हणून कडू झाला. महिना शंभर रूपये पगारावा सुरुवात केलेल्या प्रकाश कांबळेने आज जी मजल मारली आहे ती निश्चीतच कौतुकास्पद आहे. प्रकाश कांबळे आव राज्यातील मातब्बर आणि प्रतिशीत अशा दैनिक सामनामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून सलग २३ बर्ष काम करतो आहे. सांगलीतील तमाम पत्रकारिता क्षेत्रात त्याचा वेगळा मान आहे, बाळशासी जांभेकरांच्या नावे दिला जाणारा दर्पण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. प्रकाश कांबळे यांचे हे सारे श्रेय त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कामावरील आणि सत्यावरची असलेली अव्वल निष्ठा शेष आहे. पत्रकारितयरोबरच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्याने सांगली जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रशला संघटित करून एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. आज ६० व्या वाढदिवसानिमित शुभेच्छा देताना त्यांच्याविषयी दे दोन शब्द व्यक्त केले. मागसाजवळ मनापासून विद असली की माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो हेच प्रकाश कांबळे याने आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात सिद्ध करून दाखविले आहे.

पण मित्रांनी संघर्ष त्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे की काय? असे म्हणावे असं त्याच्या बाबतीत बारंबार पड़ताना मी पाहतोय, संकटाची मालिकाच त्याच्याभोवती पाठशिवणीचा खेळ खेळते आहे. एक संकट संपले की दूसरे संकट उभे राहते. पण कोणत्याही संकटांना न ग्रगमगता त्यावर मात करून पुन्हा त्याच संख्या जोमाने प्रकाश कामाला लागलेला मला दिसतो आहे, संघर्षावर मात करणारा हा माझा मित्र आज बवाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आला आहे. वयाची साठी त्याने गाठली आहे. वयाच्या साठीत ही तरुणांना लाजवेल असा त्याचा उत्साह आणि कामाची पद्धत पाहिली की अचंबित व्हायला होते. प्रकाश कांबळे हा आज खरोखरच पत्रकारांचा सच्चा मित्र आहे. अलिकडच्या पिडीतील पत्रकार व आम्ही सर्वच समकालीन मित्रही त्याला बापू या आदरार्थी नावाने संबोधतो, पत्रकारांचे बापू असणारा प्रकाश कांबळे याचे व्यक्तिमत्व दुर्मिळ असे आहे. या माझ्या मित्राने आयेत निश्शेने व निरपेक्ष भावनेने मित्रधन जपले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून प्रकाश कांबले

यांनी अनेक समाजोपयोगी कार्यालाही बाहुने घेतले आहे. मनाला पटेल ते बिनधास्तपणे करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे अनेकवेळा तो टीकेचाही धनी झाला आहे. अनेकांनी जे त्याच्या दिलखुलास स्वभावाचा गैरफायदाही घेतला आहे. मनाने निर्मळ आणि दिलखुलास स्वभावामुळे अनेक गैरसमावही विनाकारण निर्माण करण्याचे काम त्याच्या काही जवळच्या मित्रांनी केले. प्रकाश कांबळे हा माझा मित्र आज जिथे असायला हवा होता तिथपर्यंत तो पोहोचू शकला नराही. विशेष म्हणजे सर्वकाही क्षमता असतानाही, याची आम्हाला मनोमन खंत आहे. परंतु स्वच्छंद मनाचा हा माझा मित्र नेहमी हसतमुख राहून आहे । परिस्थितीला समाधानी मानभारा आहे. त्यामुळे त्याचे कौटुंबिक आयुष्य खरोखरच अत्यंत समाधानी आगि आनंददायी आहे. अशा या माझ्या मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मी एकच म्हणेन प्रकाश कांब ध्येय, निशा आणि चारिय या गुणाच्या जोरावर आपल्याला ते त्याने साध्य केले आहे. त्याचे एकूण जीबनच अनेकांना प्रेरणा देगारे असे आहे. ६० व्या वाढदिवसानिमित्त त्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा....!

- सुभाष खराडे,
सांगली दर्पण परिवारकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.