मुंबई : देशात आता लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्यातील निवडणुकांसाठी 17 एप्रिल रोजी प्रचार संपणार आहे. मात्र यापूर्वी 'सी व्होटर' या संस्थेने निवडणुकांबाबत ओपिनियन पोल समोर आला आहे. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचे अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत 40 आमदार अजित पवारांसोबत गेले. निवडणूक आयोगानेही पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र या निडणुकीत अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मात्र पक्षाच्या फुटीनंतरही चांगल यश मिळण्याची शक्यता आहे, राष्ट्रावादीच्या दोन्ही गटाकडे अजित पवार आण शरद पवार यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनलेली आहे. येत्या 4 जून रोजी याचे सर्व स्पष्टीकरण होईल. मात्र त्या आधी सी व्होटर या संस्थेने केलेल्या सर्वेमधून मात्र अजित पवारांना धक्का बसताना दिसत आहे. अजित पवार यांच्या खात्यात भोपळा येण्याचीच शक्यता आहे. अजित पवार यांच्या वाट्याला महायुतीत आतापर्यंत चार जागा आल्या आहेत. तर नाशिकच्या जागेवर शिंदे गट भाजप आणि अजितपवार गटात रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही. मात्र या जागेवरही अजित पवार गट पिछाडीवर जाईल, असे चित्र आहे. अजित पवार यांची बारामतीत पॉवर वाढवण्यासाठी रासपचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचाही फायदा अजित पवारांना होताना दिसत नाही. कारण सर्व्हेच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.