Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत उरुसातील बैलगाडा अंगावर गेल्याने तरुणाचा मृत्यू

सांगलीत उरुसातील बैलगाडा अंगावर गेल्याने तरुणाचा मृत्यू

सांगली : सध्या गावोगावी यात्रा-जत्रा सुरू आहेत. अनेक ठिकाणी यानिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसानिमित्त बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. या शर्यतीदरम्यान बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


अंगावरुन चाक गेल्याने मृत्यू

रोहन राजेंद्र घोरपडे (वय 23) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेनुसार बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, यातीलच एक बैलगाडा पळत असताना थेट बैलगाडा बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि नेमके त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले त्यामुळे रोहनचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.