सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी महापालिकेच्या सावली निवारा केंद्रास भेट देऊन येथील बेघरांशी संवाद साधला. याठिकाणी सेवा-सुविधांचा आढावा घेतानाच बेघरांना कौशल्यानुसार काम देण्याची ग्वाही दिली.
आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी केंद्रास भेट दिली. यावेळी निवारा केंद्रातील बेघर लोकांशी गुप्ता यांनी खाली जमिनीवर बसून संवाद साधला. अनेक शासकीय अधिकारी बऱ्याचदा उभ्या उभ्याच विभागांना भेट देतात किंवा केबिनमधील पाहुणचार घेऊन जातात. नव्या आयुक्तांनी बेघरांना जागेवरून न उठवता त्यांच्याजवळ बसून संवाद साधला. निवरा केंद्रात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी दिली.बेघर केंद्रातील लाभार्थ्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्यांना काम उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. यावेळी ज्योती सरवदे, मतीन अमीन, मुस्तफा मुजावर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.